Nagar Urban Bank : नगर : नगर अर्बन बँकेतील (Nagar Urban Bank) घोटाळाप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा (Local Crime Branch) पोलिसांनी आणखी एक कारवाई केली आहे. बँकेचे माजी अध्यक्ष अशाेक माधवलाल कटारिया (वय- ७२, रा. टाकळी ढाेकेश्वर) यांना आज पहाटे अटक केली आहे. या गैरव्यवहार प्रकरणी बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनंतर आता पाेलिसांनी (Police) माजी संचालकाकडे माेर्चा वळवला आहे.
हे देखील वाचा: साेशल मीडियावर गप्पा ठाेकण्यापेक्षा सरकारी दरबारी हुशारी दाखवा; विरोधकांच्या टीकेवर मनोज जरांगेंचं चोख प्रत्युत्तर
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक (Nagar Urban Bank)
दरम्यान, नगर अर्बन घाेटाळाप्रकरणी दाेन दिवसांपूर्वी माजी संचालक मनेष साठे व अनिल काेठारी यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली हाेती. आता माजी संचालक कटारिया यांना अटक केली आहे.
काही आराेपी पसार (Nagar Urban Bank)
पाेलिसांच्या या कारवाईमुळे माजी संचालकांमध्ये खळबळ उडाली आहे. काही आराेपी पसार झाल्याचे समजते. फाॅरेन्सिक अहवालानुसार २९२ काेटींचा घाेटाळा असून यात शंभरहून अधिक आराेपी आहे. दरम्यान, कटारिया यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सात दिवसांची काेठडी सुनावली आहे.
नक्की वाचा: कंटेनर व दुचाकींच्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू