ZP : आशा व गटप्रवर्तकांचा जिल्हा परिषदेत थाळी नाद

ZP : आशा व गटप्रवर्तकांचा जिल्हा परिषदेत थाळी नाद

0
ZP

ZP : नगर : आशा व गटप्रवर्तकांचे तीन महिन्यांचे थकीत पेमेंट तीन दिवसात करावे व जाहीर करण्यात आलेल्या वाढीव मानधनाचा शासन (Government) निर्णय ताबडतोब निर्गमित करा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य (State of Maharashtra) आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना आणि अहमदनगर जिल्हा आशा संघटनेतर्फे जिल्हा परिषदेच्या (ZP) प्रवेशद्वारात आज थाळी नाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेल्या आशा व गटप्रवर्तक महिलांनी जोरदार निदर्शने केली. 

हे देखील वाचा: साेशल मीडियावर गप्पा ठाेकण्यापेक्षा सरकारी दरबारी हुशारी दाखवा; विरोधकांच्या टीकेवर मनोज जरांगेंचं चोख प्रत्युत्तर

आंदोलनात दीड हजार आशा वर्कर व शंभर गट प्रवर्तक सहभागी (ZP)

या आंदोलनात संघटनेच्या अध्यक्ष सुवर्णा थोरात, जिल्हा संघटक सुरेश पानसरे, आयटकचे राज्य उपाध्यक्ष सुधीर टोकेकर, वर्षा चव्हाण आदी उपस्थित हाेते. बुरुडगाव येथील भाकपच्या पक्ष कार्यालयातून मोर्चाला प्रारंभ झाला. घोषणाबाजी करत आशा व गटप्रवर्तकांचा मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला. या आंदोलनात दीड हजार आशा वर्कर व शंभर गट प्रवर्तक सहभागी झाले होते. या आंदोलनास अवतार मेहेरबाबा कामगार युनियनचे अध्यक्ष सतीश पवार, सुभाष शिंदे, अंगणवाडी सेविका सुमन सप्रे, स्मिता औटी यांनी पाठिंबा दिला.

नक्की वाचा: कंटेनर व दुचाकींच्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू

तीन महिन्याचे मानधन अजूनही देण्यात आलेले नाही (ZP)

गेल्या ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर २०२३ या तीन महिन्याचे मानधन अजूनही आशा व गटप्रवर्तकांना देण्यात आलेले नाही. सदर मानधन रक्कम शासनाने मंजूर केलेली आहे. परंतु, आशांच्या खात्यावर यायला अजून विलंब होत आहे. दोन महिन्यांपूर्वी शासनाने मुंबई येथील बैठकीत व आझाद मैदान आणि नागपूर येथील मोर्चात आशा वर्कर यांना ७ हजार रुपये व गटप्रवर्तक यांना १० हजार रुपये वाढ जाहीर केलेली आहे. त्या वाढीचा शासन निर्णय अद्यापि निघालेला नसल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here