Narendra Modi : श्रीगोंदा: भाजप (BJP) सर्वात जास्त मताधिक्य पारनेर तालुक्यातून घेणार असल्याचे सांगत मतदारसंघाच्या विकासासाठी मागील पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सर्वात जास्त काम केले असून कधीच त्याची जाहिरात केली नाही. मी केलेल्या विकासकामांवर, माझ्या शिक्षणावर आणि माझ्या कर्तुत्वावर विश्वास असून त्याच्या जोरावरच मत मागणार असल्याचे डॉ.सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी बेलवंडी येथे सांगितले.
हे देखील वाचा : मतदानावर बहिष्कार टाकू नका; जिल्हाधिकाऱ्यांचे ग्रामस्थांना आवाहन
विकासासाठी राजकारण (Narendra Modi)
बेलवंडी येथे मंगळवारी (ता.१६) कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमात ते बोलत होते. विखे म्हणाले, सर्वसामान्य जनतेच्या आधारावर आम्ही मागील ५० वर्ष राजकारण करत आहोत. या ५० वर्षाच्या काळात आम्ही कोणावर षडयंत्र रचले नाही, ना कोणावर दडपशाही केली. पैशाच्या मोहापायी आम्ही राजकारण करत नाहीत तर विकासासाठी राजकारण करत आहोत.
नक्की वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते, तर राम मंदिर झालेच नसते : सुजय विखे
श्रीगोंदा तालुक्यात एमआयडीसी (Narendra Modi)
मतदारसंघात १० हजार कोटींचे रस्ते ३ वर्षात केले असून श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील कृषी महामंडळाच्या जागेवरील एमआयडीसीचा सातबारा तयार झाला आहे. उत्तर महाराष्ट्रात सर्वात कमी किमतीमध्ये उद्योग क्षेत्रासाठी जमीन उपलब्ध करून देत येणाऱ्या पाच वर्षात ६ हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. भाजपचे युवक प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहटा, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार, जेष्ठ नेते भगवानराव पाचपुते, ॲड. बाळासाहेब काकडे, गणपत काकडे, बाळासाहेब महाडिक, संदीप नागवडे, सुभाष शिंदे, मिलिंद दरेकर, ॲड. महेश दरेकरआदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.