Accused : रांजणगाव मशीद येथील दरोड्यातील सहा आरोपी गजाआड

Accused : रांजणगाव मशीद येथील दरोड्यातील सहा आरोपी गजाआड

0
Accused
Accused : रांजणगाव मशीद येथील दरोड्यातील सहा आरोपी गजाआड

Accused : नगर : पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथील दरोडा प्रकरणातील सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेचे (Local Crime Branch) पथक व सुपा पोलिसांनी (Police) काल (मंगळवारी) जेरबंद केले. जेरबंद आरोपींकडून (Accused) दोन लाख ६८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पथकाने हस्तगत केला.

हे देखील वाचा : मतदानावर बहिष्कार टाकू नका; जिल्हाधिकाऱ्यांचे ग्रामस्थांना आवाहन

मारहाण करत दोन लाख ४८ हजारांची चोरी (Accused)

रमेश सीताराम भोसले (वय ३०), दिनेश वतऱ्याब भोसले (वय ३३), सागर पानतास भोसले (वय २२), शशिकांत सीताराम भोसले (वय २४), वसीम वतऱ्याब भोसले (वय १९), राहुल रवी भोसले (वय २४, सर्व रा. विठ्ठलवाडी रस्ता, कामरगाव, ता. नगर) अशी जेरबंद आरोपींची (Accused) नावे आहेत. रांजणगाव मशीद येथील वसंत जवक हे त्यांच्या कुटुंबियांसह सोमवारी (ता. १५) घरात झोपले असताना अनोळखी सहा जण खोलीच्या दरवाजाची कडी उघडून आत आले. त्यांनी फिर्यादीसह कुटुंबियांना लाकडी दांडके व कोयत्याने मारहाण करत जखमी केले. तसेच सोन्याचे दागिने, रोख रक्कम व इतर घरगुती साहित्य असा दोन लाख ४८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या बाबत जवक यांनी सुपा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करून घेतला होता.

नक्की वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते, तर राम मंदिर झालेच नसते : सुजय विखे

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी (Accused)

या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. जवक कुटुंबियांनी केलेले वर्णन, गुन्ह्याची पद्धती व गेलेला माल या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासले. याच वेळी पथकाला माहिती मिळाली की, हा गुन्हा रमेश भोसले व त्याच्या साथीदारांनी केला आहे. हे आरोपी (Accused) कामरगाव शिवारातील एका हॉटेलमध्ये येणार आहेत. त्यानुसार पथकाने सुपा पोलिसांसह जाऊन आरोपींना जेरबंद केले. यावेळी त्यांचा साथीदार पायल काळे (रा. भोरवाडी, ता. नगर) हा पसार झाला. जेरबंद आरोपींकडून पथकाने दोन लाख ६८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पथकाने हस्तगत केला. यात १५ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र,५ ग्रॅम वजनाचे डोरले, २४ हजार ५०० रुपये रोख, एक दुचाकी, दोन लोखंडी कत्ती, एक तलवार याचा समावेश आहे. पथकाने जेरबंद आरोपींना पुढील तपासासाठी सुपा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here