Narendra Modi : मेरी माटी, मेरा देश उपक्रम; जिल्ह्यातील मातीचा ‘अमृत कलश’ पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सुपूर्द

0
278

नगर : आझादी का अमृतमहोत्सव अंतर्गत ‘मेरी माटी मेरा देश (Meri Mati Mera Desh) उपक्रमामध्ये १ सप्टेंबर ते १ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ‘अमृत कलश यात्रा’ आयोजित करण्यात आली. या उपक्रमांर्गत जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, सर्व तालुके, व महापालिका यांच्याकडून संकलित केलेल्या मातीचा एक ‘अमृत कलश’ कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी येथे नुकत्याच्या पार पडलेल्या कार्यक्रमात सुपूर्द केला.

हे देखील वाचा : वर्कफ्रॉम होम जॉबच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी जेरबंद

अमृत कलश उपक्रमांतर्गत गावस्तरावर अमृत कलश तयार करताना घरोघरी माती गोळा करतेवेळी जाणीवजागृती, मि‌ट्टीगान, विविध वाद्ये वाजवून व उत्सवाचे वातावरण करून माती गोळा करण्याचा कार्यक्रम करण्यात आला. सर्व गावातील कलश तालुक्याला प्राप्त झाल्यानंतर तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी १ ते १३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. गाव ते जिल्हा कार्यक्रमामध्ये केंद्र सरकारकडून देण्यात आलेली पंचप्राण (शपथ) घेण्यात आली. अमृत कलश यात्रेमधील माती कलश व स्वयंसेवकांचे ड्रेस कोड डिझाईन निश्चित करण्यात आले होते. गावस्तरीय संकलित झालेल्या कलशांमधून तालुकास्तरावरुन एक कलश तयार करुन तो २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळपर्यंत मुंबईला आणून २७ ऑक्टोबर २०२३ रोजी ऑगस्ट क्रांती मैदान येथे प्रत्येक तालुक्यातून २ स्वयंसेवक व एक जिल्हा समन्वयक यांच्याद्वारे पाठविण्यात आला. नागरी भागासाठी सर्व नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतीकरिता जिल्हास्तरावर एक कलश करण्यात आला होता. तसेच महापालिकांचा स्वतंत्र एक कलश तयार केला होता. सर्व माती कलश निवडलेल्या स्वयंसेवक युवकांद्वारे मुंबई येथे पाठविण्याची व्यवस्था करण्यासाठी योग्य ते नियोजन करण्यात आले होते.

हे देखील वाचा : खूशखबर; एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट सहा हजारांचा बाेनस जाहीर

२७ ऑक्टोबर रोजी मुंबई ऑगस्ट क्रांती मैदान येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्य मंत्री, विरोधी पक्ष नेते, संसद सदस्य, विधीमंडळ सदस्य, मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी, महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांच्या उपस्थितीत एक भव्य कार्यक्रम पार पडला. मुंबई येथे आलेले सर्व कलश याच स्वयंसेवकांमार्फत २७ ऑक्टोबर रोजीच्या मुंबई येथील कार्यक्रमानंतर लगेच सायंकाळी ४ ते ६ च्या दरम्यान विशेष रेल्वेने दिल्ली येथे नेण्यात आले. नवी दिल्ली येथे सर्व स्वयंसेवकांची व्यवस्था केंद्र सरकारच्या सांस्कृतिक व युवक कल्याण मंत्रालयाद्वारे करण्यात आली होती. ३० ऑक्टोबर रोजी दिल्ली येथील कर्तव्यपथावर अंतिम पूर्व सोहळा आयोजित करण्यात आला होता. ३१ ऑक्टोब रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अंतिम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.