Nilesh Lanke : “देवाचा दरबार म्हणजे ड्रोन कॅमेरा आहे; तो प्रत्येकाचा हिशोब ठेवतो : खासदार नीलेश लंके

Nilesh Lanke : “देवाचा दरबार म्हणजे ड्रोन कॅमेरा आहे; तो प्रत्येकाचा हिशोब ठेवतो : खासदार नीलेश लंके

0

Nilesh Lanke : नगर : सरकारमध्ये काही अडचणी असतात; मात्र देवाच्या कृपेने काट्यातूनही मार्ग निघतो, असे सांगत त्यांनी नाथ परंपरेच्या खडतर प्रवासाचा उल्लेख केला. “आपण नाथांच्या भूमीत जन्मलो आहोत. गोरक्षनाथ देवस्थानाचे (Gorakshnath Gad) रूपांतर ‘नंदनवनात’ करण्याचा आपला निर्धार आहे,” “देवाचा दरबार म्हणजे ड्रोन कॅमेरा (Drone Camera) आहे; तो प्रत्येकाचा हिशोब ठेवतो. त्यामुळे श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे काम करा. देव कोणालाही माफ करत नाही; पण प्रामाणिकांना साथ देतो,” असे सांगत त्यांनी देवस्थान ट्रस्टच्या कार्याचे कौतुक केले. गावकऱ्यांनी एकजुटीने राहून देवस्थानाचा चेहरामोहरा बदलावा, असे आवाहन खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी केले.

Nilesh Lanke : “देवाचा दरबार म्हणजे ड्रोन कॅमेरा आहे; तो प्रत्येकाचा हिशोब ठेवतो : खासदार नीलेश लंके
Nilesh Lanke : “देवाचा दरबार म्हणजे ड्रोन कॅमेरा आहे; तो प्रत्येकाचा हिशोब ठेवतो : खासदार नीलेश लंके

हे पहा : शेकडो वर्षापासूनची डसन डुक्कराची प्रथा आजही कायम

चैतन्य गोरक्षनाथ गड मंदिरात कलशरोहन

अहिल्यानगर तालुक्यातील आदर्श गाव मांजरसुंबा येथील चैतन्य गोरक्षनाथ गड मंदिरात कलशरोहन कार्यक्रमानिमित्त आयोजित तीन दिवसीय कीर्तन सोहळ्याला धार्मिक वातावरणात उत्साहपूर्ण प्रारंभ झाला. खासदार निलेश लंके यांच्या हस्ते ध्वजपूजन करून सोहळ्याची सुरुवात करण्यात आली, यावेळी ते बोलत होते.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

ईश्वर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली नवनाथ पारायणास प्रारंभ (Nilesh Lanke)

ईश्वर महाराज कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नवनाथ पारायणास प्रारंभ झाला असून, परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तन-भजनाचा लाभ घेत आहेत. सोहळ्याच्या निमित्ताने विविध संतांची कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली आहे. आज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत जगन्नाथ महाराज पाटील यांचे कीर्तन होणार आहे. ५ मार्चला श्रीनिवास महाराज घुगे, ६ मार्च रोजी गुरुवर्य जंगले महाराज शास्त्री यांची कीर्तन सेवा पार पडणार आहे. ७ मार्च रोजी महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते कलशरोहन सोहळा पार पडेल. त्यानंतर काल्याचे कीर्तन होणार आहे.

Nilesh Lanke : “देवाचा दरबार म्हणजे ड्रोन कॅमेरा आहे; तो प्रत्येकाचा हिशोब ठेवतो : खासदार नीलेश लंके
Nilesh Lanke : “देवाचा दरबार म्हणजे ड्रोन कॅमेरा आहे; तो प्रत्येकाचा हिशोब ठेवतो : खासदार नीलेश लंके

ध्वजपूजनानंतर बोलताना खासदार लंके म्हणाले, “श्री क्षेत्र गोरक्षनाथ देवस्थान हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे येणाऱ्या भाविकांच्या सुविधा वाढवण्यासाठी दोन कोटी रुपयांचा विकास प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख तीर्थक्षेत्रांना किमान दोन कोटी रुपयांचा निधी मिळावा, यासाठी मी प्रयत्नशील आहे.” “ज्या गावातील मंदिरे सुदृढ आहेत, ते गाव गुण्यागोविंदाने नांदते. जिथे मंदिरे दुर्लक्षित असतात, तिथे वाद-विवाद निर्माण होतात. त्यामुळे श्रद्धास्थानांचे जतन हेच गावाच्या ऐक्याचे प्रतीक आहे. देवाच्या दारात राजकारणाला स्थान नाही; श्रद्धा, एकजूट आणि विकास या त्रिसूत्रीवर काम करणे आवश्यक आहे,” असे लंके यांनी स्पष्ट केले.

Nilesh Lanke : “देवाचा दरबार म्हणजे ड्रोन कॅमेरा आहे; तो प्रत्येकाचा हिशोब ठेवतो : खासदार नीलेश लंके
Nilesh Lanke : “देवाचा दरबार म्हणजे ड्रोन कॅमेरा आहे; तो प्रत्येकाचा हिशोब ठेवतो : खासदार नीलेश लंके

या वेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही मनोगत व्यक्त केले. “श्री क्षेत्र गोरक्षनाथ गड हे आमच्या तीन पिढ्यांचे श्रद्धास्थान आहे. माझ्या वडिलांनी येथे वीज पोहोचवली; आमदार असताना मी मंदिर रस्ता आणि स्ट्रीटलाईटचे काम मार्गी लावले. आजचा कलशरोहन सोहळा ही अध्यात्मिक परंपरेची शान आहे,” असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास माजी सभापती रघुनाथ झिने, गोविंद मोकाटे, जयराम कदम, मारुती कदम, डॉ. राम कदम, नगरसेवक योगीराज गाडे, रामेश्वर निमसे आदी उपस्थित होते. दरम्यान, खासदार लंके यांनी बाल वारकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या कुटुंबांची विचारपूस केली. शालेय शिक्षणाबरोबरच आध्यात्मिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले. “तुमच्यातूनच चांगला समाज निर्माण होईल,” असा विश्वास व्यक्त करत त्यांनी ह.भ.प. ईश्वर महाराज कदम यांच्या धार्मिक कार्याचे कौतुक केले. आश्रमाला शासनाच्या माध्यमातून निधी मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.