Hunting : कर्जत: मिरजगाव पोलीस ठाण्याच्या (Police Station) हद्दीत मागील काही दिवसांपासून रात्रीच्या चोऱ्या व घरफोड्यांचे प्रमाण वाढले होते. या पार्श्वभूमीवर कर्जत पोलिसांच्या गस्त पथकाला मंगळवारी (ता. ०३) पहाटे ४च्या सुमारास चांदे-बिटकेवाडी जंगल (Forest) परिसरात गस्त घालत असताना दोन दुचाकींवरून जाणारे चार पुरुष व एक महिला संशयास्पदरीत्या हालचाली करताना आढळले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करताच एका दुचाकीवरील (Two Wheeler) दोन संशयितांनी गाठोडे व दुचाकी घटनास्थळीच टाकून अंधाराचा फायदा घेत पळ काढला, तर दुसऱ्या दुचाकीवरील संशयित दुचाकीसह फरार झाले.
हे वाचा : तरुणीच्या घरात जाऊन तरुणाची आत्महत्या; श्रीगोंद्यातील घटना
गाठोड्यात दोन जिवंत हरणे
घटनास्थळी सापडलेल्या गाठोड्यांची तपासणी केली असता, त्यात शिकार करून ठार मारलेले एक हरिण व पाय-तोंड बांधलेल्या अवस्थेत दोन जिवंत हरणे आढळली. यापैकी एका जिवंत हरणास तात्काळ नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजगावचे सहायक पोलीस निरीक्षक विजय झंजाड, पोलीस कर्मचारी सुनील खैरे, गोकुळ पळसे राजेंद्र गाडे यांनी सदरची कारवाई पार पाडली.
नक्की पहा : अमेरिका इराणच्या दुश्मनीचा इतिहास?
शिकारीचे साहित्य जप्त (Hunting)
या घटनेत १ हिरो कंपनीची मोटार सायकल, हरिण पकडण्यासाठीची जाळी, दोरी, शाल, विवो कंपनीचा मोबाईल हँडसेट असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरचा मुद्देमाल वनपरिक्षेत्र अधिकारी संकेत उगले, वनरक्षक सागर वाकचौरे, आजिनाथ ननावरे, हरिभाऊ बारगजे व दिनकर लिलके यांच्या ताब्यात देण्यात आला असून, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. या प्रकरणी ४ पुरुष व १ महिला संशयित आरोपींची नावे निष्पन्न करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.



