Crime : तरुणीच्या घरात जाऊन तरुणाची आत्महत्या; श्रीगोंद्यातील घटना  

Crime : तरुणीच्या घरात जाऊन तरुणाची आत्महत्या; श्रीगोंद्यातील घटना

0
Crime : तरुणीच्या घरात जाऊन तरुणाची आत्महत्या; श्रीगोंद्यातील घटना
Crime : तरुणीच्या घरात जाऊन तरुणाची आत्महत्या; श्रीगोंद्यातील घटना

Crime : नगर : श्रीगोंदे (Shrigonda) शहरातील शिवाजीनगर येथे तरुणीच्या घरात जाऊन तरुणाने तिच्यासमोरच गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. मंगळवारी (ता. ०३) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सागर सखाराम निंबाळकर (वय २५, रा. श्रीगोंदा स्टेशन) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो बँकेत नोकरी (Job) करत होता.

नक्की वाचा : शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरूच; प्रशासनासोबतची चर्चा फिस्कटली  

नेमकं काय घडलं?

मंगळवारी दुपारी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास सागर हा शिवाजीनगर परिसरातील एका खोलीत राहणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीकडे आला होता. त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर त्याने कपडे वाळू घालायच्या तिच्यासमोरच गळफास घेऊन आत्महत्या केली. घटना तरुणीसमोर घडल्याने ती घाबरून गेली.

हे पहा : कोपरगाव तालुक्यात मादी बिबट्या व बछडा पिंजऱ्यात जेरबंद

कारण अस्पष्ट (Crime)

घटनेची माहिती मिळताच श्रीगोंदा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. संबंधित तरुणाला उपचारासाठी श्रीगोंद्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. यानंतर मयताचा नातेवाईक किरण तुकाराम निंबाळकर (वय वर्षे ३५) यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सदर घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी पुढील तपास पोलिस करत आहेत.