
America Israel Iran war : नगर : इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष (America Israel Iran war) आता आशियाई (Asia) देशांच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. 4 मार्च 2026 अमेरिकेच्या एका अण्वस्त्रसज्ज पाणबुडीने (Nuclear-armed submarine) श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीजवळ इराणची महत्त्वाची युद्धनौका ‘IRIS Dena’ वर टॉरपेडो हल्ला (Torpedo attack) करून ती बुडवली. या भीषण हल्ल्यात इराणचे किमान 87 नौसैनिक ठार झाले असून, ही घटना दुसऱ्या महायुद्धानंतरची अशा प्रकारची पहिलीच लष्करी कारवाई मानली जात आहे.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
नेमकी घटना काय?
श्रीलंकेच्या गाले (Galle) बंदरापासून सुमारे 40 नॉटिकल मैल (75किमी) अंतरावर आंतरराष्ट्रीय पाण्यामध्ये ही घटना घडली. पहाटे 5: 30 च्या सुमारास ‘IRIS Dena’ या जहाजावरून धोक्याचे संदेश (Distress Call) प्राप्त झाले. अमेरिकन संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी पेंटागॉनमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुष्टी केली की, “एका अमेरिकन पाणबुडीने इराणच्या या युद्धनौकेला लक्ष्य केले. ज्या जहाजाला वाटत होते की ते आंतरराष्ट्रीय पाण्यात सुरक्षित आहे, त्याला टॉरपेडोने जलसमाधी दिली आहे.”
हे पहा : शेकडो वर्षापासूनची डसन डुक्कराची प्रथा आजही कायम
भारताशी असलेले कनेक्शन (America Israel Iran war)
विशेष म्हणजे, ही युद्धनौका फेब्रुवारी 2026 मध्ये भारतात विशाखापट्टणम येथे पार पडलेल्या ‘मिलन 2026’ (MILAN 2026) या बहुराष्ट्रीय नौदल सरावात सहभागी झाली होती. हा सराव संपवून आपल्या मायदेशी परतत असतानाच अमेरिकेने तिला वाटेत गाठून नष्ट केले. भारताच्या शेजारील देशाच्या सीमेजवळ ही घटना घडल्याने भारतीय संरक्षण क्षेत्रातही चिंतेचे वातावरण आहे.
बचावकार्य आणि हानी
- मृत्यू: श्रीलंकेच्या नौदलाने आतापर्यंत 87 मृतदेह बाहेर काढले आहेत.
- बचाव: 32 जखमी नौसैनिकांना श्रीलंकेच्या नौदलाने वाचवले असून त्यांना गाले येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
- बेपत्ता: जहाजावर सुमारे 180 कर्मचारी होते, त्यापैकी 60 हून अधिक जण अद्याप बेपत्ता आहेत.युद्धाची भीषणता वाढली.


