Income Tax Slabs : कर रचनेत कोणताही बदल नाही; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा

आज या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर रचनेत म्हणजे टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नसल्याची मोठी घोषणा केली आहे.

0
Nirmala Sitaraman
Nirmala Sitaraman

नगर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४-२५ साठीचा अंतरिम अर्थसंकल्प (Union Budget) संसदेत सादर केला. निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) या सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत. आज या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर रचनेत म्हणजे टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नसल्याची मोठी घोषणा केली आहे.

नक्की वाचा : आता कुणाचा बापही मराठा आरक्षण राेखू शकत नाही; छगन भुजबळांना कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळातून बाहेर काढा : आमदार संजय गायकवाड

कर रचनेत कोणताही बदल नाही : निर्मला सीतारामन ( Income Tax Slabs)

कर रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. सध्या आयकर भरणाऱ्यांना कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. आता ७ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर आकारला जात नाही. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच आयकर भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. परतावा देखील त्वरीत जारी केला जातो. जीएसटी संकलन दुपटीने वाढले आहे. जीएसटीने अप्रत्यक्ष कर प्रणाली बदलली आहे, असं सीतारामन यांनी सांगितले आहे.

अवश्य वाचा : तेजश्री प्रधानच्या ‘लोकशाही’ चित्रपटाचा ट्रेलर आऊट

दहा वर्षांत करसंकलन तीन पटीने वाढले (Income Tax Slabs)

वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, वित्तीय तूट ५. १ टक्के राहण्याचा अंदाज आहे. खर्च ४४.९० कोटी रुपये असून अंदाजे महसूल ३० लाख कोटी रुपये आहे. १० वर्षात आयकर संकलनात तीन पट वाढ झाली आहे. मी कर दरात कपात केली आहे. ७ लाख रुपये उत्पन्न असलेल्यांवर कोणताही कर भरावा लागणार नाही. २०२५-२६ पर्यंत तूट आणखी कमी होईल.

हेही पहा : बजेटपूर्वी केंद्र सरकारकडून दिलासा; मोबाईल फोन स्वस्त होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here