Onion : अकोले : केंद्र सरकारने (Central Govt) कांद्याची निर्यातबंदी (Export ban) उठवण्याची घोषणा केली आहे. प्रत्यक्षात मात्र अटी शर्ती लागू करून कांद्याची (Onion) निर्यात होणार नाही, अशाप्रकारे डावपेच करण्यात आले असल्याचा गंभीर आरोप अखिल भारतीय किसान सभेचे केंद्रीय सहसचिव डॉ. अजित नवले यांनी केला.
हे देखील वाचा: जातीवाचक शिवीगाळ, नग्न करुन मारहाण; तरुणाची आत्महत्या
४० टक्के निर्यात शुल्क लागू
कांद्याच्या निर्यातीसाठी प्रतिटन ५५० डॉलर किमान निर्यात मूल्य व ४० टक्के निर्यात शुल्क लागू करण्यात आले आहे. यामुळे भारतीय कांदा निर्यात करताना त्याचे शुल्क ६४ रुपये प्रतिकिलोपर्यंत जाणार आहे. निर्यातीचा खर्च पाहता संबंधित देशात भारतीय कांदा पोहचेल तेव्हा त्याची किंमत ७० ते ७५ रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचणार आहे. संबंधित देशात ३० रुपये ते ५० रुपये प्रतिकिलोप्रमाणे कांदा उपलब्ध असल्यामुळे ७० ते ७५ रुपये प्रतिकिलो किमतीचा भारतीय कांदा तेथे कुणी घेणार नाही. परिणामी निर्यातबंदी उठवली असली तरी प्रत्यक्षात कांद्याची निर्यात होणार नाही.
नक्की वाचा: नरेंद्र माेदींकडून आराेग्य विकास प्रक्रियेशी जाेडण्याचे महत्त्वपूर्ण काम : राधाकृष्ण विखे पाटील
अटी शर्तींचा हा खेळ शेतकरी विरोधी (Onion)
केंद्र सरकारचा अटी शर्तींचा हा खेळ शेतकरी विरोधी असून एकीकडे दिल्यासारखं करायचं दुसरीकडे मात्र अटी शर्ती लागू करून शेतकऱ्यांना कोणताही दिलासा मिळणार नाही यासाठी डावपेच करायचे, अशा प्रकारची कृती केंद्र सरकारने केली आहे. केंद्र सरकारने अटी शर्तींचे हे डावपेच थांबवावेत व कांद्याची निर्यात बंदी संपूर्णपणे उठवून विनाअट कांदा निर्यातीसाठी प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी किसान सभेच्यावतीने डॉ. अजित नवले यांनी केली आहे.