Operation Sindoor :’ऑपरेशन सिंदूर’च्या परदेश मिशनसाठी शिष्टमंडळ आज रवाना होणार; हे ‘५’ संदेश देणार 

0
Operation Sindoor :'ऑपरेशन सिंदूर'च्या परदेश मिशनसाठी शिष्टमंडळ आज रवाना होणार; हे '५' संदेश देणार 
Operation Sindoor :'ऑपरेशन सिंदूर'च्या परदेश मिशनसाठी शिष्टमंडळ आज रवाना होणार; हे '५' संदेश देणार 

Operation Sindoor : पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवून पाकिस्तानला चांगला धडा शिकवलं आहे. आता ऑपरेशन सिंदूरचा उद्देश आणि पाकिस्तानचा खरा चेहरा जगाला सांगण्यासाठी देशातील ५९ जणांचे शिष्टमंडळ (A delegation of 59 people) आज (ता.२१) विविध देशांमध्ये रवाना होतील. ही एक मोठी राजनैतिक मोहीम आहे, जी आजपासून सुरू होत आहे. यामध्ये, खासदार जगातील ३३ राजधान्यांमध्ये जाणार आहेत.

५९ खासदार ७ सर्वपक्षीय टीममध्ये विभागले आहेत. ८ माजी राजनैतिक अधिकारी देखील त्यांच्यासोबत असतील. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी मंगळवारी खासदारांना या उपक्रमाबद्दल माहिती दिली. समोर आलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन सिंदूरची पार्श्वभूमी आणि या ३३ देशांना राजनैतिक आणि लष्करी कारवाईचे पाच प्रमुख संदेश पाठवण्यावर भर देण्यात आला आहे.

नक्की वाचा : ‘चिडिया’ या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; चित्रपटात ‘हे’ कलाकार झळकणार  

५९ खासदार जगाला काय संदेश देणार ? (Operation Sindoor)

१. दहशतवादावर शून्य सहनशीलता

ऑपरेशन सिंदूर दहशतवादी गट आणि त्यांच्या संरचनांविरुद्ध होते हे सांगितले जाईल. झालेल्या कारवाईत दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले. मात्र पाकिस्तानी सैन्याने हा हल्ला स्वतःवरचा हल्ला मानला आणि त्याला प्रत्युत्तर दिले अशी माहिती यामध्ये देण्यात येणार आहे.

२. पाकिस्तान दहशतवादाचा समर्थक

यामध्ये खासदार काही पुरावे घेत आहेत, ज्यामध्ये ते उत्तर देशांना सांगतील की, पहलगाम हल्ल्यात पाक-समर्थित दहशतवादी संघटना द रेझिस्टन्स फ्रंट ची भूमिका होती. खासदार याआधी झालेल्या हल्ल्यांची संपूर्ण यादी देखील घेत आहेत.

३. भारत जबाबदार आणि संयमी आहे

भारताने लष्करी कारवाईतही जबाबदारी आणि संयम दाखवला. कोणत्याही निष्पाप पाकिस्तानी नागरिकाचा जीव जाऊ नये, याची खात्री केली. पाकिस्तानने कारवाई थांबवण्याची विनंती केली, तेव्हा भारताने ती तत्परतेने स्वीकारली.

४. जगाने दहशतवादाविरुद्ध एकत्र यावे

खासदार दहशतवादाविरुद्ध उघडपणे आवाज उठवण्यासाठी आणि त्याचा सामना करण्यासाठी या देशांकडून सहकार्य आणि पाठिंबा मागतील. ते भारत-पाक वादाला दहशतवादाविरुद्ध युद्ध म्हणून पाहण्याचे आवाहन करतील.

५. पाकिस्तानबद्दल भारताचे धोरण

भारताने पाकिस्तानविरुद्धचा आपला बदललेला दृष्टिकोन उघड केला आहे. सीमेपलीकडून येणाऱ्या धोक्याकडे उदासीन राहण्याऐवजी, भारत सक्रिय दृष्टिकोन स्वीकारेल आणि दहशतवादी हल्लेखोरांना आधीच निष्क्रिय करेल.

 हे सर्व संदेश ५९ खासदार जगातील विविध देशांना देतील.