Heavy Rain : राज्यभरात मुसळधार पाऊस अनेक ठिकाणी पडझड

Heavy Rain : राज्यभरात मुसळधार पाऊस अनेक ठिकाणी पडझड

0
Heavy Rain : राज्यभरात मुसळधार पाऊस अनेक ठिकाणी पडझड
Heavy Rain : राज्यभरात मुसळधार पाऊस अनेक ठिकाणी पडझड

Heavy Rain : अहिल्यानगर : राज्यभर पावसाने नागरिकांची धांदल उडविली असून अनेक ठिकाणी अपघात घडत आहेत. विविध जिल्ह्यात विजांच्या गडगडाटसह मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत असून कुठे झाडं पडली आहेत, कुठे वादळी वाऱ्याने पत्रे उडाले आहेत. तर, कुठे वीज पडून जनावरे दगावल्याचीही घटना घडलीय. कल्याणमध्ये (Kalyan) एका इमारतीचे छत कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेत 6 नागरिकांचा मृत्यू (Death) झाला. या ठिकाणी बचावकार्य आता पूर्ण झाले असून, महापालिका आयुक्त स्वत: घटनास्थळी उपस्थित होते. या घटनेत 5 जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

नक्की वाचा : राजधानी दिल्लीला अलर्ट;लाल किल्ला,कुतुब मिनार सह ऐतिहासिक इमारतींच्या सुरक्षेत वाढ

मृतांच्या कुटुंबीयांना सरकारतर्फे 5 लाख अर्थसहाय्य

जिल्हा प्रशासन त्यावर देखरेख ठेवून असून, जखमींची प्रकृती सुखरुप आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मुख्यमंत्री यांनी प्रार्थना केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून सहवेदना व्यक्त केल्या. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे 5 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल असेही त्यांनी जाहीर केले.

अवश्य वाचा : पाकिस्तानचा भारतावर ‘डान्स ऑफ द हिलरी’ व्हायरसद्वारे सायबर हल्ल्याचा डाव?

सणसवाडी येथे होर्डिंग कोसळल्याची घटना (Heavy Rain)

पुण्यातही पावसाचा कहर सुरूच असून बाणेरमधील बीटवाईज चौकात अनेक वाहन पावसाच्या या पाण्यात अडकली होती. पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर वाघोलीजवळ सणसवाडी येथे एक होर्डिंग कोसळल्याची घटना घडली असून 7-8 दुचाकी या होर्डिंग्जखाली अडकल्याची माहिती आहे. सुदैवाने कुणीही जखमी झालं नसल्याची माहिती मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस सुरूच आहे, अवकाळी पावसाचा मोठा तडाखा शेतकऱ्यांना बसला आहे. पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.