Pahalgam Terror Attack:त्याने धर्म सांगताच मारली गोळी!;पहलगाम हल्ल्याची आपबिती…    

0
Pahalgam Terror Attack:त्याने धर्म सांगताच मारली गोळी!;पहलगाम हल्ल्याची आपबिती...    
Pahalgam Terror Attack:त्याने धर्म सांगताच मारली गोळी!;पहलगाम हल्ल्याची आपबिती...    

Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील (Jammu kashmir) पहलगाममध्ये (Pahalgam Attack) काल मंगळवारी पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये (Terrorist attack) तब्बल २६ जणांचा मृत्यू (Deaths) झाला असून अनेक जण जखमी झाल्याची घटना घडलीय. या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. ‘तुम्ही मुस्लिम आहात का’? नाव विचारलं आणि पहलगाममध्ये गोळीबार झाला.

नक्की वाचा : युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर,शक्ती दुबे देशात प्रथम तर पुण्याचा अर्चित डोंगरे महाराष्ट्रात पहिला    

नेमकं प्रकरण काय ? (Pahalgam Terror Attack)

मंगळवारचा दिवस हा जम्मू काश्मीरमधील पहलगामच्या बैसरण खोऱ्यामध्ये नेहमीसारखाच सुरू झाला.या भागातील निसर्गरम्य परिसरात दुपारच्या जवळपास एक ते दीड हजार पर्यटक पर्यटनासाठी आले होते. जसजसा दिवस वर सरकू लागला, तसतशी पर्यटकांची संख्याही वाढू लागली. मात्र या पर्यटकांबरोबरच इथे दहशतवादीही दाखल झाल्याचं कुणाच्याच लक्षात आलं नाही. कारण हे दहशतवादी पोलिसांच्या वेशात होते. त्यामुळे पर्यटकांना त्यांचा संशय आला नाही. पर्यटक पर्यटनाचा आनंद घेत असतांना अचानक तिथे दहशतवादी आले. त्यांनी या पर्यटकांना धर्म विचारला,त्यांची नाव विचारली आणि त्यानंतर गोळ्या झाडल्यात.हा गोळीबार जवळपास २० मिनिटे सुरु होता.आणि सगळं होत्याच नव्हतं झालं.  

अवश्य वाचा : मराठवाड्यात तीन महिन्यात २६९ शेतकऱ्यांनी केली आत्महत्या 

पर्यटक काय म्हणाले ? (Pahalgam Terror Attack)

या हल्ल्यातून बचावलेल्या पर्यटकांनी तपास पथकाला घडलेला प्रकार सांगितला.”तिथे चार माणसं लष्कराच्या वेषात आली. बाजूच्या घनदाट जंगलातून ते बाहेर आले. त्यांनी आल्यावर आमची नावं विचारली. आम्हाला वाटलं ते सुरक्षा अधिकारी आहेत. मात्र अचानक त्यांनी गोळीबार सुरू केला. त्यांनी पुरुषांना प्रामुख्याने लक्ष्य केलं होतं. महिलांना त्यांनी सोडून दिलं होतं. काही पुरुषांना तर त्यांनी अगदी जवळून गोळ्या घातल्या”,असं एका महिला पर्यटकानं सांगितलं. जे पर्यटक तिथून पळून जाण्याच्या प्रयत्नात होते, तेही दहशतवाद्यांनी सुरू केलेल्या अंदाधुंद गोळीबारात मरण पावले. “हल्ल्यातून वाचलेल्या एका पर्यटकानं सांगितलं की,गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर ते सगळे नजीकच्या तंबूंच्या दिशेनं पळाले. पण काही वेळातच दहशतवादी त्या तंबूंपर्यंत पोहोचले. बाजूच्याच तंबूत शिरून त्यांनी सर्व पुरुषांना बाहेर यायला सांगितलं आणि नंतर त्यांना गोळ्या घातल्या”,अशी माहिती एका अधिकाऱ्यानं दिली.

या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले कर्नाटकचे व्यापारी मंजुनाथ यांना त्यांच्या पत्नी पल्लवीसमोर दहशतवाद्यांनी गोळ्या मारल्या. यावर पल्लवी यांनी सांगितले की, मी दहशतवाद्यांना सांगितले माझ्या पतीला मारले, मलाही मारून टाका.यावर दहशतवादी म्हणाले, आम्ही तुम्हाला मारणार नाही, जाऊन मोदींना हे सांगा.ही भयानकता तू पंतप्रधान मोदींना सांगावी, यासाठी तुला सोडून देतोय, असं दहशतवादीने सांगितले,असं पल्लवी यांनी सांगितले.

मंडळी,बैसरण खोऱ्याचं ठिकाण हे पहलगाम पासून जवळपास साडेसहा किलोमीटर आहे. तिथे एकतर पायी किंवा घोड्यांवरच पोहोचता येऊ शकतं. कारण यातला सहा किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे चिखलाचा आणि ओबडधोबड आहे. त्यामुळे पर्यटकांना घटनास्थळापासून बाहेर नेण्यासाठी कोणतंही वाहन तिथे उपलब्ध नव्हतं. याच परिस्थितीचा फायदा या दहशतवाद्यांनी घेतला.

काश्मीरमधील या दहशतवादी हल्ल्यातील हृदय पिळवटून टाकणारा फोटो आणि व्हिडीओ समोर येत आहेत. यामध्ये एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. एक नवविवाहिता पहलगाम या ठिकाणी आपल्या पतीसोबत फिरायला गेली होती. तिचा नवरा या गोळीबारात ठार झाला आहे. त्याच्या मृतदेहाजवळ ती स्तब्ध बसून आहे. तिचा हा मूक आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा ठरला आहे. शुभम द्विवेदी यांच्या पत्नीचा हा फोटो आहे. इशान्या असं तिचं नाव आहे. या दोघांचंही लग्न दोन महिन्यांपूर्वी झालं होतं.

तसेच एका पाच वर्षाच्या मुलाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. या मुलाच्या वडिलांना त्यांचा धर्म विचारून मारण्यात आलं आणि वडिलांच्याच मृतदेहावर त्याला ठेवण्यात आलं होत. असे एक ना अनेक व्हिडिओ या घटनेत समोर आलेत. हे सगळं विदारक दृश्य पाहताना डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही.या घटनेनंतर प्रशासन नेमक काय करणार हेच पाहून आता महत्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here