Pandharpur : पंढरीत देवगडच्या क्षेत्रप्रदक्षिणा दिंडीचे स्वागत 

Pandharpur : पंढरीत देवगडच्या क्षेत्रप्रदक्षिणा दिंडीचे स्वागत 

0
Pandharpur : पंढरीत देवगडच्या क्षेत्रप्रदक्षिणा दिंडीचे स्वागत 
Pandharpur : पंढरीत देवगडच्या क्षेत्रप्रदक्षिणा दिंडीचे स्वागत 

Pandharpur : नेवासा: आषाढी वारीच्या (Ashadhi Wari) निमित्ताने नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड (Shri Kshetra Devgad) येथील श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या पालखीची पंढरपूर (Pandharpur) नगरीमध्ये बुधवारी (ता.२) क्षेत्र प्रदक्षिणाद्वारे दिंडी (Dindi) काढण्यात आली. या पालखी दिंडीचे पंढरपूरनगरीत भाविकांच्या वतीने चौकाचौकात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. 

अवश्य वाचा : शनैश्वर देवस्थान विरोधात विशाल सुरपुरिया यांची धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार

सुमारे दोन हजार भाविक सहभागी

“ज्ञानोबा माऊली तुकाराम” असा जयघोष करत काढण्यात आलेल्या या दिंडीत सुमारे दोन हजार भाविक सहभागी झाले होते. श्रीक्षेत्र देवगडच्या क्षेत्र प्रदक्षिणा दिंडीने पंढरपूरवासियांचे लक्ष वेधले होते. श्रीक्षेत्र पंढरपूर येथील भिमा तिराजवळ असलेल्या देवगड संस्थानच्या मठामधील प्रांगणातून महंत  भास्करगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत बुधवारी सकाळी ७ वाजता श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या पालखी मिरवणूकीस प्रारंभ झाला. यावेळी देवगड येथील श्री गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत भास्करगिरीजी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते पुष्पांनी सजविण्यात आलेल्या श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या पालखीतील पादुकांची पूजा करण्यात आले.      

नक्की वाचा : रेल्वेभाडेवाढ ते तत्काळ तिकीट;भारतीय रेल्वेच्या नियमामध्ये आजपासून मोठे बदल           

प्रदक्षिणा पालखी दिंडीची भीमा तिरी सांगता (Pandharpur)

यावेळी काढण्यात आलेल्या पालखी प्रदक्षिणा दिंडीमध्ये संतसेवक नारायण महाराज ससे, गणपत महाराज आहेर, लक्ष्मण महाराज नांगरे, संतसेवक बाळकृष्ण महाराज कानडे, तात्या महाराज शिंदे, गिरीजीनाथ महाराज, रामनाथ महाराज पवार यांच्यासह हजारो महिला व पुरुष भाविक सहभागी झाले होते. तब्बल सव्वा तीन तास चाललेल्या पायी प्रदक्षिणा पालखी दिंडीची सांगता उत्तर भीमा तिरी असलेल्या देवगडच्या मठाच्या प्रांगणात करण्यात आली.