Liquor Ban : अकोले: तालुक्यातील सावरचोळ ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर अवैध (Illegal) दारू अड्ड्यावर ग्रामसभा (Gram Sabha) घेत महिलांनी क्रांतिकारी पाऊल उचलत दारुबंदीला (Liquor Ban) प्रोत्साहन देणारे पाच ठराव ग्रामसभेत मंजूर केले.
नक्की वाचा : साईभक्तांसाठी मोठी बातमी;शिर्डीतील सर्व दुकानांसाठी आता एकच दरपत्रक
महिला, पुरुषांनी अवैध दारू अड्ड्यावर केला हल्लाबोल
येथे दोन वर्षापूर्वी तीन अवैध दारूअड्डे होते. महिलांनी पूर्वी दोन अड्डे जमीनदोस्त केले होते. मात्र, गावात एक अवैध अड्डा सुरूच होता. यामुळे त्रासलेल्या महिलांनी सरपंच अनिता कानवडे, उपसरपंच सचिन कानवडे व शंभर-दीडशे महिला, पुरुषांनी अवैध दारू अड्ड्यावर हल्लाबोल केला. अड्ड्याच्या भिंती, पत्रे शेड पाडली. शंभरपेक्षा जास्त भरलेल्या देशी-विदेशी दारू बाटल्यांचा ढीग केला.
अवश्य वाचा : रेल्वेभाडेवाढ ते तत्काळ तिकीट;भारतीय रेल्वेच्या नियमामध्ये आजपासून मोठे बदल
पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल (Liquor Ban)
या घटनेची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विकास काळे यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. दारू विकणारे सयाजी कानवडे, रवींद्र चांदमोरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ग्रामसेवक महेश कोळपकर, ग्रामपंचायत कर्मचारी हजर होत अड्ड्यावरच ग्रामसभा घेतली. महिलांच्या उपस्थितीत सभेत पाच ठराव मंजूर केले.