PBKS vs MI : मुंबईचा पंजाबवर निसटता विजय;शशांक आशुतोषची झुंज व्यर्थ

मुंबई इंडियन्सने पंजाबला ऑल आऊट करत ९ धावांनी निसटता विजय मिळवला. जसप्रीत बुमराहला या सामन्यासाठी सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

0
PBKS vs MI
PBKS vs MI

नगर : आयपीएल (IPL 2024) मध्ये ३३ वी मॅच मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात पार पडली. या अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने शेवटी बाजी मारली. मुंबई इंडियन्सने पंजाबला ऑल आऊट करत ९ धावांनी निसटता विजय मिळवला. जसप्रीत बुमराहला या सामन्यासाठी सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

नक्की वाचा : नगर लाेकसभेसाठी पहिल्याच दिवशी २३ उमेदवारांनी नेले ४२ अर्ज

मुंबईनं पहिल्यांदा फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये सात विकेटवर १९२ धावा केल्या. यामध्ये सूर्यकुमार यादवने ७८ धावांची खेळी केली. पंजाब आणि मुंबई यांच्यातील ही लढत अटीतटीची झाली. पंजाब किंग्जचा संघ १८३ धावांवर बाद झाला आणि मुंबईनं ९ धावांनी विजय मिळवला. आशुतोष शर्मा आणि शशांक सिंगला पंजाबच्या इतर फलंदाजांची म्हणावी तशी साथ मिळाली नाही, त्यामुळे पंजाबचा निसटता पराभव झाला.

पंजाबचा शेवटचा खेळाडू धावबाद झाल्यानं मुंबईचा विजय (PBKS vs MI)

मुंबई इंडियन्सनं पहिल्यांदा फलंदाजी करत विजयासाठी ठेवलेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाब किंग्जची सुरुवात खराब झाली. पंजाब किंग्जनं धावसंख्येचा पाठलाग करताना सातत्यानं जाणाऱ्या विकेट न गमावण्याकडे लक्ष दिलं नाही. मुंबईच्या बॉलर्सनी पंजाबच्या फलंदाजांना मोठे फटके मारु दिले नाहीत. शशांक सिंग, आशुतोष शर्मा या दोन्ही फलंदाजांनी संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. आशुतोष शर्मानं ६१ धावा केल्या. शर्मानं २८ बॉलमध्ये ७ षटकार आणि २ चौकारासह ६१ धावा केल्या. दुसरीकडे पंजाब किंग्जचा फलंदाज शशांक सिंगनं३ षटकार आणि दोन चौकारांसह ४१ धावा केल्या. अखेरच्या ओव्हरमध्ये १२ धावा हव्या असताना पंजाबचा शेवटचा खेळाडू धावबाद झाल्यानं मुंबईनं विजय मिळवला.

अवश्य वाचा : भारत लोकसंख्येच्या बाबतीत ठरला अव्वल; चीनलाही टाकले मागे

सूर्यकुमार यादवची तुफीनी खेळी (PBKS vs MI)

नाणेफेक गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करत ७ बाद १९२ धावा केल्या. सलामीला आलेला इशान किशन स्वस्तात बाद झाला पण रोहितने २५ चेंडूत ३६ धावांची शानदार खेळी केली. तर सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा आपला दमदार फॉर्म दाखवून दिला. सूर्याने ५३ चेंडूत ३ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ७८ धावा केल्या. रोहित आणि सूर्याने ८१ धावांची चांगली भागीदारी रचली. त्यानंतर तिलक वर्मानेही १८ चेंडूत ३४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यानंतर टीम डेव्हिड १४ धावा करत बाद झाला. अखेरच्या षटकांमध्ये पंजाबने सामन्यात पुनरागमन करत मुंबईच्या धावांना ब्रेक लावला आणि मुंबईला २०० धावांचा टप्पा गाठू दिला नाही. पंजाबकडून हर्षल पटेलने ३ विकेट्स घेतले तर सॅम करनने २ विकेट्स आणि रबाडाला १ विकेट मिळाली. अखेरच्या ओव्हरमध्ये १२ धावा हव्या असताना पंजाबचा शेवटचा खेळाडू धावबाद झाल्यानं मुंबईनं विजय मिळवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here