Rahul Gandhi : नीलेश लंकेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राहुल गांधी येणार

Rahul Gandhi : नीलेश लंकेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राहुल गांधी येणार

0
Rahul Gandhi
Rahul Gandhi : नीलेश लंकेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राहुल गांधी येणार

Rahul Gandhi : नगर : सध्या लाेकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) शक्तीप्रदर्शन, जंगी सभा अन् दिग्गजांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची एकप्रकारे स्पर्धा लागली आहे, अशाच नगर लाेकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) येणार आहे.

हे देखील वाचा: शेततळ्यात बुडून सख्ख्या भावांचा मृत्यू

लंके म्हणाले

”उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. मात्र, अर्ज भरण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी येणार आहे. त्यांच्याशी माझं कालच बोलणं झाल असून लवकरच अर्ज भरण्याची तारीख आपण सांगणार आहे.”  

नक्की वाचा: रामभक्तांच्या अलोट गर्दीने संगमनेरकर भारावले

महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके (Rahul Gandhi)

नगर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून नीलेश लंके यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. महाराष्ट्र्रात लोकसभा निवडणुकीसाठी एकूण पाच टप्प्यात मतदान होणार आहे. नगर लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होईल. तर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुरुवात झाली असून २५ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी हे उपस्थित राहतील, अशी माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here