Police : नगर : कोतवाली पोलीस ठाणे (Kotwali Police Station) हद्दीत दरोडा (Robbery) टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी कोतवाली पोलिसांच्या (Police) पथकाने जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून प्राणघातक हत्यारे असा एकूण १० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नक्की वाचा : हरिश्चंद्रगड, रतनगड, सांधण दरी परिसरात पर्यटनास तात्पुरती बंदी
या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल
गोलूसिंग नसीबसिंग पटवा (वय. २२, रा. पाचोली, ता. खकनार, बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश), पातालसिंग दिलीपसिंग सिकलीगर (वय. २०, रा. एकता नगर, नंदुरबार), आकाशसिंग कैलाससिंग सिकलीगर (रा.उदान प्रभू नगर, गुजरात), व इतर दोन व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्याचे संभाजी दादाभाऊ कोतकर यांनी फिर्याद दिली आहे.
अवश्य वाचा : सीएकडून व्यवसायिकाची ३८ लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
याबाबत माहिती अशी की, (Police)
कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना माळीवाडा परिसरात काही अज्ञात व्यक्ती संशयित रित्या फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार गस्ती पथकास सूचना देऊन कारवाईचे आदेश दिले. गस्ती पथकाने मिळालेल्या माहितीनुसार संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दरोडा टाकण्यासाठी लागाणारे साहित्य, घातक हत्यार असा एकूण १० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करणयात आला आहे.