Police : श्रीगोंद्यात जुगार अड्ड्यावर छापा; २२ जणांना घेतले ताब्यात

Police : श्रीगोंद्यात जुगार अड्ड्यावर छापा; २२ जणांना घेतले ताब्यात

0
Police : श्रीगोंद्यात जुगार अड्ड्यावर छापा; २२ जणांना घेतले ताब्यात
Police : श्रीगोंद्यात जुगार अड्ड्यावर छापा; २२ जणांना घेतले ताब्यात

Police : श्रीगोंदा: शहरातील पेडगाव रस्त्यावरील सोनवणे वस्तीवरील बंद पडलेल्या पोल्ट्रीफार्म वर सुरू असलेल्या २१ पानी जुगार (Gambling) अड्ड्यावर प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे (Santosh Khade) यांच्या पथकाने सिनेस्टाईल छापा मारून रोख रकमेसह ३७ लाख ५८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणात जुगार खेळणाऱ्या २२ जणांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले तर एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा (Crime) दाखल करण्याचे काम सुरू होते.

अवश्य वाचा : सीएकडून व्यवसायिकाची ३८ लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

मालवाहतूक पिकअपमध्ये जाऊन छापा

प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांना श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत श्रीगोंदा शहरानजीक पेडगाव रस्त्यावरील सोनवणे वस्ती वरील बंद पडलेल्या पोल्ट्रीफॉर्म वर जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. सदरची पोल्ट्री ही मुख्य रस्त्यापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर होती. कारवाईसाठी जाताना आरोपी पसार होऊ नये म्हणून पोलिस उपअधीक्षक खाडे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील डीबी पथकासह दोन मालवाहतूक पिकअप मध्ये गेले.

नक्की वाचा : हरिश्चंद्रगड, रतनगड, सांधण दरी परिसरात पर्यटनास तात्पुरती बंदी

शंका येऊ नये म्हणून पिकअपवर लावले उसाचे वाढे (Police)

आरोपींना या कारवाईची शंका येऊ नये म्हणून त्यांनी पिकअपवर उसाचे वाढे लाऊन गाडी ताडपत्रीने झाकून नेत अचानक छापा मारला. यावेळी पोलिसांनी २२ आरोपींना ताब्यात घेतले तर एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला. या कारवाईत पोलिसांनी २ लाख २२ हजार ८०० रुपयांची रोख रक्कम ताब्यात घेतली. तसेच ५ लाख ९६ हजार रुपयांचे २४ महागडे मोबाईल आणि २८ लाख ९० हजार रुपयांची ९ चारचाकी तसेच दुचाकी वाहने जप्त केली.