Police : नगर : श्रीरामपूर शहरासह तालुक्यात पोलीस (Police) अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांनी नेमलेल्या विशेष पोलीस पथकाने (Special Police Squad) अवैधपने सुरू मटका बुकींवर छापा टाकून २२ संशयित आरोपींवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ८ लाख ६१ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नक्की वाचा : हिंदी विरोधातील मोर्चाच्या तारखेत बदल; आता निघणार या दिवशी मोर्चा
संशयित आरोपींची नावे
मुनीर इमाम पठाण (वय.५५), अभिजीत ऋषभ मुथ्था (वय. ४०), सादिक शहाबुद्दीन शेख (वय ३०), आकाश कैलास पोटे (वय २४), अवधूत मारुती शिंदे (वय २३), लीलाजीत अर्जुन यादव (वय ३१), संदीप बाबुराव सूर्यवंशी (वय ४१), सचिन नंदकुमार गावडे (वय ३७), सागर सुरेश बनगे (वय ३०), शाहरुख चांदखास (वय २८), किसन म्हसू शिंदे (वय ७०), महेश रामकृष्ण पवार (वय ४५), विक्रांत रवींद्र लोखंडे (वय ३५), राहुल कैलास चौधरी (वय ३०), ललित नामदेव तांबे (वय २९), राजू दिनकर ताभाडे (वय ५६), मंजूर सवीर सय्यद (वय ३६), ख्वाज़ा खान सद्दारदारखान पठाण (वय ४८), स्वप्निल नामदेव तांबे (वय ३२), नामदेव रंगनाथ गोंधरे (वय ४५), नसरुद्दीन मल्लाउद्दीन शेख (वय ६०), अल्ताफ उरामण शेख (वय ६२), अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत त्यांच्याकडून तब्बल ८ लाख ६१ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : अहिल्यानगर एमआयडीसी परिसरात खुनाचा प्रयत्न करणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई
सापळा रचून कारवाई केली (Police)
विशेष पथकातील पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांना मिळालेल्या माहितीनुसार श्रीरामपूर शहरात अवैध मटका बुकी सुरु असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून कारवाई केली. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अमलदार शकील शेख, शंकर चौधरी, अजय साठे, अरविंद भिंगारदिवे, मल्लिकार्जुन बनकर, दिनेश मोरे, उमेश खेडकर, सुनील पवार, सुनील दिघे, अमोल कांबळे, विजय ढाकणे, दीपक जाधव, जालिंदर दहिफळे यांच्या पथकाने केली.