Police : नगर : नगर शहरात हरवलेले (lost) व चोरी गेलेले ११ लाख ३५ हजारांचे ४० मोबाईल (Mobile) तोफखाना पोलिसांनी (Police) तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हस्तगत करुन मूळ मालकांना आज परत केले.
हे देखील वाचा : सोमय्यांचा वातावरण निर्मितीचा केविलवाणा प्रयत्न : जयंत पाटील
नगर शहरातील चोरीस गेलेले मोबाईल शोधून काढण्याची मोहीम तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे व त्यांच्या पथकाने हाती घेतली होती. त्यानुसार त्यांनी आधुनिक तांत्रिक विश्लेषण पद्धतीचा आधार घेत चोरीस गेलेले ४० मोबाईल शोधून काढले. हे मोबाईल ११ लाख ३५ हजार रुपये किमतीचे आहेत. पोलीस निरीक्षक साळवे यांनी मोबाईलच्या मूळ मालकांना त्यांचे मोबाईल परत केले आहे. त्यामुळे नागरिकांनी साळवे यांना समक्ष भेटुन त्यांच्या कामाचे कौतुक करुन तोफखाना पोलिसांचे विशेष आभार मानले. पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे , पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय जपे, दिनेश मोरे, भानुदास खेडकर, पोलीस कॉन्स्टेबल सुमित गवळी, दक्षिण मोबाईल सेल, नगरचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिंदे यांनी ही कामगिरी केली.
नक्की वाचा : सदाशिव लोखंडेंनी आखले नव्या राजकीय खेळीचे मनसुबे
‘नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी अथवा बाजार करताना आपले मोबाईल शर्टच्या वरच्या खिशात ठेवू नये. रस्त्यावर सापडलेला मोबाईल अथवा चोरीचा मोबाईल विकत घेऊ नये. मोबाईल हरवल्यास अथवा चोरी गेल्यास तात्काळ तोफखाना पोलीस ठाणे येथे संपर्क करावा,” असे आवाहन पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांचे नागरिकांना केले आहे.