Police : जिल्ह्यात १७ पोलीस निरीक्षक व ७ सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Police : नगर : नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) राकेश ओला यांनी आज (मंगळवारी) आदेश काढून जिल्ह्यातील १७ पोलीस (Police) निरीक्षक व ७ सहायक पोलीस निरीक्षक अशा २४ अधिकाऱ्यांच्या बदल्या (Transfers) केल्या आहेत.

0
Police
Police

Police : नगर : नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) राकेश ओला यांनी आज (मंगळवारी) आदेश काढून जिल्ह्यातील १७ पोलीस (Police) निरीक्षक व ७ सहायक पोलीस निरीक्षक अशा २४ अधिकाऱ्यांच्या बदल्या (Transfers) केल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच पोलीस ठाण्यांचे प्रमुख बदलले आहेत. त्यामुळे कोतवाली, तोफखाना, एमआयडीसी, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यांत नवीन पोलीस निरीक्षक कारभार पाहणार आहेत.

नक्की वाचा : अवैध मुरूम वाहतूक करणाऱ्या वाहनाची धडक ; धडकेत एक जखमी

आगामी लोकसभा निवडणुक तयारी (Police)

नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी नाशिक विभागातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या चार दिवसांपूर्वी केल्या होत्या. त्यानुसार नगर जिल्ह्यातील १० पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याच्या बाहेर बदल्या झाल्या आहेत. तर जिल्ह्याबाहेरील ९ पोलीस निरीक्षक नगर जिल्ह्यात रुजू झाले आहेत. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आगामी लोकसभा निवडणुकीतील बंदोबस्ताची तयारी लक्षात घेऊन २४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

Police
Police

हे देखील वाचा :  संक्रांतीच्या दिवशी चिकनच्या दुकानात वाद; युवकाचा खून

अशी असणार बदलीची ठिकाणे (Police)

त्यानुसार पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांची बदली पारनेर पोलीस ठाण्यातून आर्थिक गुन्हे शाखेत, ज्योती गडकरी यांची बदली सुपे पोलीस ठाण्यातून जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षात, विजय करे यांची अकोले पोलीस ठाण्यातून जिल्हा विशेष शाखेत, प्रताप दराडे यांची जिल्हा विशेष शाखेतून कोतवाली पोलीस ठाण्यात, अरूण आव्हाड यांची आर्थिक गुन्हे शाखेतून सुपा पोलीस ठाण्यात, संजय ठेंगे यांची बेलवंडी पोलीस ठाण्यातून राहुरी पोलीस ठाण्यात, संजय सोनवणे यांची राहुरी पोलीस ठाण्यातून आश्वी पोलीस ठाण्यात, अशोक भवड यांची मानवसंसाधनमधून शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात, संतोष भंडारे यांची आश्वी पोलीस ठाण्यातून बेलवंडी पोलीस ठाण्यात, गुलाबराव पाटील यांची शिर्डीच्या वाहतूक शाखेतून अकोले पोलीस ठाण्यात, नितीनकुमार चव्हाण यांची नियंत्रण कक्षातून वाचक पोलीस निरीक्षक कार्यालयात, आनंद कोकरे यांची तोफखाना पोलीस ठाण्यात, नितीन देशमुख यांची श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात, सतीश घाटेकर यांची मानवसंसाधनमध्ये, समीर बारावकर यांची पारनेर पोलीस ठाण्यात, संदीप कोळी यांची कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात, रामकृष्ण कुंभार यांची शिर्डी पोलीस ठाण्यात, सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांची पाथर्डी पोलीस ठाण्यातून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात, माणिक चौधरी यांची सोनई पोलीस ठाण्यातून एमआयडीसी पोलीस ठाण्यात, आशिष शेळके यांची शेवगाव पोलीस ठाण्यातून सोनई पोलीस ठाण्यात, कैलास वाघ यांची राहाता पोलीस ठाण्यातून लोणी पोलीस ठाण्यात, युवराज आठरे यांची लोणी पोलीस ठाण्यातून सायबर पोलीस ठाण्यात, दीपक सरोदे यांची शेवगाव पोलीस ठाण्यातून राजूर पोलीस ठाण्यात, रामचंद्र कर्पे यांची सोनई पोलीस ठाण्यातून भरोसा सेलमध्ये बदली करण्यात आली आहे.

Police
Police

अवश्य वाचा : जिल्ह्यात १७ पोलीस निरीक्षक व ७ सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

नगर शहराच्या पोलीस ठाण्यातील अधिकारी

कोतवाली पोलीस ठाणे – पोलीस निरीक्षक प्रताप दराडे
तोफखाना पोलीस ठाणे – आनंद कोकरे
भिंगार कॅम्प पोलीस ठाणे – योगेश राजगुरू
एमआयडीसी पोलीस ठाणे – माणिक चौधरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here