Police : नगर : नगर शहरातील व्यापाऱ्याने बँकेत भरणा करण्यासाठी दिलेली रक्कम लंपास करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने २४ तासांत गजाआड केला. त्याच्याकडून नऊ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी (Police) हस्तगत केला आहे. सुशील प्रकाश बिरादार (वय २९, रा. वाणीनगर, पाईपलाईन रस्ता, नगर) असे जेरबंद आरोपीचे (Accused) नाव आहे.
हे देखील वाचा : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली
रक्कम बँकेत न भरता लंपास (Police)
व्यापारी प्रताप इर्दवानी यांच्याकडे बिरादार हा कामाला होता. इर्दवाणी यांनी बँकेत भरणा करण्यासाठी बिरादारकडे १० लाख रुपये दिले होते. बिरादारने ही रक्कम बँकेत न भरता लंपास केली. या संदर्भात इर्दवानी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार कोतवाली पोलिसांनी विश्वासघात व चोरीचा गुन्हा दाखल करून घेतला.
या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता.
अवश्य वाचा:प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी ‘या’ देशाचे राष्ट्राध्यक्ष प्रमुख पाहुणे असणार
आरोपी कर्नाटक राज्यातील रहिवासी (Police)
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तपास करताना माहिती मिळाली की, बिरादार हा कर्नाटक राज्यातील बिदर तालुक्यातील मूळ रहिवासी आहे. त्यानुसार पथकाने बिदर येथे जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, बिदरच्या रस्त्यावरील मोहोळ (जि. सोलापूर) बसस्थानकात पथकाला बिरादार दिसून आला. पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे नऊ लाख ४१ हजार रुपये रोख व एक मोबाईल आढळून आला. पथकाने पुढील तपासासाठी त्याला कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
नक्की वाचा : प्रजासत्ताकदिनी राजपथावर अवतरणार शिवरायांचा चित्ररथ