Ram temple : उद्या ‘राम मंदिर से रामराज्य’ विषयावर सुनील देवधर यांचे व्याख्यान

Ram temple : नगर : राष्ट्रीय एकात्मतेसाठी काम करणाऱ्या भारत भारती या सामाजिक संस्थेच्या वतीने नगर शहरात गेल्या १२ वर्षांपासून देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) देशभक्तीपर व्याख्यान, विविध राज्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम व देशातील सर्व राज्यांची खाद्य संस्कृतीच्या फूड फेस्टिव्हल अशा त्रिवेणी संगम असलेल्या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे.

0
Ram temple
Ram temple

Ram temple : नगर : राष्ट्रीय एकात्मतेसाठी काम करणाऱ्या भारत भारती या सामाजिक संस्थेच्या वतीने नगर शहरात गेल्या १२ वर्षांपासून देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) देशभक्तीपर व्याख्यान, विविध राज्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम व देशातील सर्व राज्यांची खाद्य संस्कृतीच्या फूड फेस्टिव्हल अशा त्रिवेणी संगम असलेल्या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. याही वर्षी शुक्रवार (ता. २६) सायंकाळी ५.३० वाजता नगर-मनमाड रस्त्यावरील हॉटेल संजोग लॉन येथे होणाऱ्या कार्यक्रमात भाजपचे (BJP) माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांचे ‘राम मंदिर (Ram temple) से रामराज्य’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिने अभिनेते गिरीश कुलकर्णी (Girish Kulkarni) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘आय लव्ह नगर’चे संस्थापक उद्योजक नरेंद्र फिरोदिया असणार आहेत, अशी माहिती भारत भारतीचे अध्यक्ष कमलेश भंडारी यांनी दिली.

अवश्य वाचा:प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी ‘या’ देशाचे राष्ट्राध्यक्ष प्रमुख पाहुणे असणार

१२ वर्षांपासून हजारो नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद (Ram temple)

मागील १२ वर्षांपासून भारत भारतीच्या वतीने आयोजित होणाऱ्या या कार्यक्रमास नगरमधील हजारो नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असतो. यावर्षीचे प्रमुख वक्ते सुनील देवधर हे देशातील राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जातात. त्यांनी त्रिपुरा आणि उत्तरांचल सारख्या दुर्गम भागात प्रतिकूल परिस्थितीत केलेले काम संपूर्ण देश विदेशात प्रसिद्ध आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दंगल चित्रपट फेम प्रसिद्ध सिने कलाकार व राष्ट्रीय पुरस्कार विजेते गिरीश कुलकर्णी यांचेही मार्गदर्शन यावेळी होणार आहे.

हे देखील वाचा : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

भव्य फूड फेस्टीव्हल (Ram temple)

राष्ट्रभक्तीने भरलेल्या या कार्यक्रमा निमित्त आयोजित भव्य फूड फेस्टीव्हलमध्ये भारतातील सर्व राज्यांचे वैशिष्ट्य असलेल्या खाद्य पदार्थांचा आस्वाद नागरिकांना घेता येणार आहे. तसेच शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी, विविध ग्रुपचे कलाकार देश भक्तीपर व विविध राज्यांचा पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. भारत भारतीच्या या अनोख्या उपक्रमातून बौद्धीक, सांस्कृतिक व खाद्य अशा त्रिवेणी संगम असलेल्या कार्यक्रमाची नगरकर अतुरतेने वाट पाहत असतात, अशी माहिती भारत भारतीचे उपाध्यक्ष रमेश रासने यांनी दिली.

नक्की वाचा : प्रजासत्ताकदिनी राजपथावर अवतरणार शिवरायांचा चित्ररथ

या त्रिवेणी कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घेऊन फूड फेस्टीव्हलचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन भारत भारतीच्यावतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजाभाऊ मुळे, वाल्मिक कुलकर्णी, प्रदीप पंजाबी, के के शेट्टी, राजेंद्र अगरवाल, मिलिंद कुलकर्णी हे मार्गदर्शन करत आहेत. भारत भारतीचे प्रोजेक्ट चेअरमन चंद्रशेखर आरोळे व दिनेश छाब्रिया, उपाध्यक्ष समीर बोरा, सचिव संदीप कोद्रे, चिराग शाह, खजिनदार हिरालाल पटेल, हरिश हरवानी अशोक मवाळ, राजू लक्ष्मण, युवराज पोटे यांच्यासह महिला विभागाच्या अध्यक्षा विनया शेट्टी, उपाध्यक्षा स्वीटी पंजाबी, सचिव विनिता छाब्रिया, मयूरा कोद्रे, खजिनदार मीना हरवानी, संघटन प्रमुख श्रेया देशमुख आदी प्रयत्नशील आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here