Police Patil : पाेलीस पाटील पदभरतीसाठी ईश्वरी चिठ्ठीने आरक्षण साेडत 

Police Patil : पाेलीस पाटील पदांची ईश्वरी चिठ्ठीने आरक्षण साेडत 

0
Police Patil : पाेलीस पाटील पदांची ईश्वरी चिठ्ठीने आरक्षण साेडत 
Police Patil : पाेलीस पाटील पदांची ईश्वरी चिठ्ठीने आरक्षण साेडत 

Police Patil : नगर : नगर जिल्ह्यातील पोलीस पाटील (Police Patil) पदाच्या रिक्त जागांसाठी सरकारने पदाची भरती (Recruitment of the post) प्रक्रिया सुरू केली. नगर जिल्ह्यातील सहा तालुक्यातील ४७६ गावांसाठी नुकतेच आरक्षण (reservation) काढण्यात आले.  अकोले, संगमनेर, पाथर्डी, शेवगाव, नेवासे आणि नगर तालुक्यातील गावांचे आरक्षण काढण्यात आले.

नक्की वाचा : संसदेत घुमतोय महाराष्ट्राचा आवाज; खासदार सुजय विखेंनी मांडली भिंगारकरांची बाजू

गेल्या दहा वर्षांपासून भरण्यात आल्या नव्हत्या. पोलिस प्रशासन आणि महसूल प्रशासनाला या रिक्त जागांमुळे दैनंदिन कामकाजासाठी माहिती मिळत नव्हती. जे पोलिस पाटील कार्यरत होते, त्यांच्यावर चार-पाच गावांची जबाबदारी होती. अखेर राज्य शासनाने या पदाची भरती प्रक्रिया सुरू केली. सुरुवातीला तहसीलदार संजय शिंदे, नायब तहसीलदार अभिजीत वांढेकर यांनी स्वागत केले. त्यानंतर प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी सभागृहातील उपस्थितांना आरक्षण कोणत्या पद्धतीने काढले जाते. आरक्षणाच्या सोडतीची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली.

हे देखील वाचा : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असंवेदनशील : बाळासाहेब थोरात

नगर-नेवासे तालुक्यातील १२९ गावांच्या पोलीस पाटील पदासाठी आरक्षण काढण्यात आले. प्रांताधिकारी गावांचे गाव लिहिलेल्या चिठ्ठ्या सभागृहात दाखवून प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये टाकत होते. सर्व चिठ्ठ्या एकत्र मिसळून ईश्‍वरी श्रीकांत ढवळे या पाच वर्षी मुलीच्या हस्ते आरक्षणाची सोडत काढण्यात आली. ईश्‍वरीने चिठ्ठी काढल्यानंतर ती चिठ्ठी सभागृहात दाखविली जात होती. सर्वांनी पाहिल्यानंतर त्या चिठ्ठीच्या मागे आरक्षणाची नोंद करण्यात आली.

अनुसूचित जाती (१६) : नगर- निंबोडी, पिंपळगाव लांडगा, नांदगाव, वाळुंज, पिंपळगाव कौडा, मेहकरी, नेवासे : चिंचबन, कारेगाव, खुपटी, सुरेगाव-दही. महिला राखीव (५) : खांडके, खंडाळा, टाकळी काझी, निंबळक, शहापूर -केतकी (सर्व ता.नगर).

अनुसूचित जमाती (१५) : नगर- शिंगवे नाईक, खारे कर्जुने, नेवासे- बोरगाव, खलालपिंप्री, खेडले काजळी, गोमळवाडी, बेलपांढरी, वाटापूर, दिघी. महिला राखीव (५)– विळद, आठवड, हातवळण (ता. नगर), पाचेगाव, खेडले परमानंद (ता. नगर).

विशेष मागास प्रवर्ग (४) : घोगरगाव, रांजणगाव देवी, हंडीनिमगाव (ता. नेवासे), महिला सारोळा बद्धी (ता. नगर).

विमुक्त जाती (अ) जागा ५ : माथणी, कोल्हेवाडी, सारोळा कासार (ता.नगर), महिला (२) भेंडा खुर्द (नेवासे), गुणवडी (ता.नगर).

विमुक्त जाती (ब) जागा ५ : म्हसले, रामडोह, भेंडा बुद्रुक, टोका, मुरमे (ता. नेवासे), महिला (२) ः म्हसले, रामडोह (ता. नेवासे).

विमुक्त जाती (क) जागा १ : पाचुंदा (ता. नेवासे).

विमुक्त जाती (ड) जागा १ : पांगरमल (ता. नगर).

इतर मागास प्रवर्ग २२ जागा : नगर- बारदरी, नागरदेवळे, रतडगाव, अकोलनेर, नवनागापूर, सोनेवाडी (चास), बाबुर्डी घुमट, पिंपळगाव माळवी, दहिगाव, निमगाव वाघा, कापूरवाडी, वाटेफळ, मांजरसुंबा. नेवासे-बेल्हेकरवाडी, गोपाळपूर. महिला ः बहिरवाडी, सांडवे, भोरवाडी, कामरगाव, (ता. नगर). नजीक चिंचोली, शिंगवे तुकाई, गोंडेगाव (ता. नेवासे).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here