Unseasonal rain : अवकाळी, गारपिटीनंतर आता धुक्याचे सावट; शेतकरी चिंतेत

Unseasonal rain : अवकाळी, गारपिटीनंतर आता धुक्याचे सावट; शेतकरी चिंतेत

0
Unseasonal rain : अवकाळी, गारपिटीनंतर आता धुक्याचे सावट; शेतकरी चिंतेत
Unseasonal rain : अवकाळी, गारपिटीनंतर आता धुक्याचे सावट; शेतकरी चिंतेत

Unseasonal rain : नगर : खरिपात झालेले नुकसान रब्बी हंगामात भरुन काढण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला होता. मात्र, संकटाची मालिका ही रब्बी हंगामातही सुरुच आहे. त्यामुळे वाढीव उत्पादन तर सोडाच पण शेतकऱ्यांनी जे जमिनीत पेरले आहे. त्याची भरपाई (Compensation) तरी होते की नाही, अशी परस्थिती निर्माण झाली आहे. नगर जिल्ह्यात अवकाळी,(Unseasonal rain) ढगाळ वातावरण आणि आता धुके (Fog) याचा परिणाम पिकांवर होत आहे.

हे देखील वाचा : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असंवेदनशील : बाळासाहेब थोरात

तीन दिवसांपासून पडत असणाऱ्या धुक्यामुळे पिकांची हानी होत आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. विशेषत: ज्वारी, गहू, हरभरा या पिकांची वाढ खुंटलेली आहे. त्यामुळे उत्पादनावर अधिकचा खर्च करावा की नाही, अशी स्थिती बळीराजाची झाली आहे. कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वातवरण कोरडे झाल्यावरच शेतकऱ्यांना पिकांचे व्यवस्थापन हे करता येणार आहे.

नक्की वाचा : संसदेत घुमतोय महाराष्ट्राचा आवाज; खासदार सुजय विखेंनी मांडली भिंगारकरांची बाजू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here