President : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले शनिदर्शन

President : नगर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी आज शनिशिंगणापूर (Shani shinganapur) येथे शनिदर्शन घेत श्री शनैश्वर मूर्तीची मनोभावे पूजा केली. यावेळी राष्ट्रपतींनी (President)

0
President : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले शनिदर्शन
President : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले शनिदर्शन

President : नगर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी आज शनिशिंगणापूर (Shani shinganapur) येथे शनिदर्शन घेत श्री शनैश्वर मूर्तीची मनोभावे पूजा केली. यावेळी राष्ट्रपतींनी (President) श्री शनैश्वर मूर्तीस तैलाभिषेकही केला.

President : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले शनिदर्शन
President : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले शनिदर्शन

हे देखील वाचा : आरक्षणाचा तिढा, उपाय काय?; पाेपटराव पवारांनी सांगितला ताेडगा

यावेळी राज्यपाल रमेश बैस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.

President : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले शनिदर्शन
President : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले शनिदर्शन

नक्की वाचा : छगन भुजबळ पनवती’; मनोज जरांगेंची भुजबळांवर टीका

राष्ट्रपतींनी मुर्मू यांनी उदासी महाराज मठात त्यांनी अभिषेकही केला. जिल्हा प्रशासनातर्फे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रपतींचा सत्कार केला. शनिशिंगणापूर संस्थानचे अध्यक्ष भागवत बनकर, उपाध्यक्ष विकास बनकर, कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदले यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना शनिदेवाची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सन्मान केला. राष्ट्रपतींनी शनिदर्शन घेतल्यानंतर प्रसादालयात प्रसादाचे सेवनही केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here