Prime Minister Narendra Modi : अहिल्यानगर : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) पहिल्यांदाच देशाला संबोधित करत पाकिस्तानला (Pakistan) इशारा दिला आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने (India) राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) पाकिस्तानकडून भारतावर हवाई हल्ले करण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले होते मात्र भारताने आपल्या एअर डिफेन्स सिस्टमने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले.
अवश्य वाचा : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये इस्रोची एन्ट्री; पाकिस्तानच्या हालचालीवर इस्रोच्या १० उपग्रहांची नजर
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,
पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. पाकिस्तानने धार्मिक स्थळं, शाळांना लक्ष्य केलं. मात्र भारताने पाकिस्तानचे ड्रोन हवेतच नष्ट केले तसेच तीन दिवसात भारतानं पाकला नेस्तनाबूत केलं आणि भारताच्या हल्ल्यामुळे पाक बचावात्मक भूमिकेत आला असं देखील पंतप्रधान मोदी म्हणाले.
पुढे बोलताना मोदी म्हणाले की, (Prime Minister Narendra Modi)
पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी धर्म विचारुन आतंकवाद्यांनी 26 जणांचा जीव घेतला होता. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशाकडून कारवाई मागणी होत होती. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आम्ही भारतीय लष्कराला स्वातंत्र्य दिले होते. आम्ही आमच्या बहिणींच्या कपाळावरचं सिंदूर हटवण्याचा बदला घेतला असं पंतप्रधान मोदी म्हणाले. या कारवाईत पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना उद्ध्वस्त केले. भारतानं 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला अशी माहिती देखील पंतप्रधान मोदी यांनी दिली.
यापुढे दहशतवादी हल्ले करणार नसल्याचं पाकनं सांगितलं आहे. असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. तर आम्ही पाकविरोधातील कारवाई फक्त स्थगित केलीय. येणाऱ्या काळात पाकच्या प्रत्येक हालचालींवर भारताची नजर राहणार असा इशारा देखील पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला दिला.