Pune Crime : नगर : पुण्याचे भाजपचे आमदार सुनील कांबळे (BJP MLA Sunil kamble) यांचा आणखी एक पराक्रम समोर आला आहे. ससून रुग्णालयात (sassoon hospital) आमदार सुनील कांबळे यांनी एका पोलीस कॉन्स्टेबलच्या कानशिलात लगावली आहे. त्याआधी सुनील कांबळे यांनी या कार्यक्रमासाठी आलेल्या राष्ट्रवादीच्या (NCP) एका पदाधिकाऱ्यालाही मारहाण (Beating) केली आहे.महत्त्वाची बाब म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) कार्यक्रमासाठी उपस्थित असतानाच हा सगळा प्रकार घडला आहे.
नक्की वाचा : साईबाबांच्या चरणी भक्तांकडून भरभरुन देणगी; अकरा दिवसांत १६ कोटींचं दान
जितेंद्र सातव (Jitendra satav)असे मारहाण झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचे नाव आहे. ससून रुग्णालयाच्या कोनशिलेवर आपले नाव नाही, यामुळे कांबळे यांना राग अनावर झाला. त्यांनी आपला संताप व्यासपीठावरुन खाली उतरताच सातव यांच्यावर काढला. सातव हे राष्ट्रवादी वैद्यकीय पक्षाचे केंद्र प्रमुख आहेत. ससून रुग्णालयातील तृतीयपंथीयांच्या वॉर्ड उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान हा सगळा प्रकार घडला आहे.
अवश्य वाचा : मराठा आरक्षणाच्या मुंबई पदयात्रेच्या नियोजनासाठी पारनेरमध्ये बैठक
पायऱ्यावरुन खाली उतरच असतानाच सुनील कांबळे यांनी पोलीस हवालदाराच्या देखील कानामागे लगावली आहे. शिवाजी सरक असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिस कर्मचारी हे सुरक्षा आणि त्यांचे काम बजावत असताना कांबळे यांनी पोलीस कर्मचाऱ्याला कानशिलात लावली आहे. या प्रकारामुळे सर्वजण अवाक झाले. दरम्यान सुनील कांबळे यांनी केलेली मारहाणीची दिवसभरातील ही दुसरी घटना आहे. या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. पुण्यातील ससून रुग्णालयात अजित पवार यांच्या हस्ते विविध वॉर्डचे उद्घाटन करण्यात आले. याचवेळी तृतीयपंथीसाठी केलेल्या नवीन वाॅर्डचेही उद्घाटन करण्यात आलं आहे. याप्रसंगी महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, सह भारतीय जनता पार्टीचे आमदार सुनील कांबळे हे उपस्थित होते. त्याचदरम्यान, हा सगळा प्रकार घडला आहे.