संगमनेर : तालुक्याला चांगल्या फलंदाजांची गरज आहे, समोरून कसाही बाॅल आला तरी टोलावता आला पाहीजे. फिल्डींग कशी लावायची ते माझ्यावर सोडा,अशी शाब्दीक फटकेबाजी करीत महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी जनार्दन आहेर (Janardhan Aher) यांना आता एकच संघ निश्चित करण्याचा सल्लाही दिला.
नक्की वाचा : अखेर मराठा आंदोलनाची दिशा ठरली; २० जानेवारीपासून मनाेज जरांगेंचं मुंबईत आमरण उपाेषण
घारगाव (Ghargaon) येथे आयोजित करण्यात आलेल्या नामदार चषक क्रिकेट स्पर्धेचा (Cricket Tournament) पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी ते बोलत होते. हिंदुहृदय स्रमाट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन मागील २१ वर्षांपासून करण्यात येत आहे. यावेळी राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पर्धेचे औचित्य साधत क्रिकेटच्या भाषेतच राजकीय फलंदाजी करून केलेल्या सूचक वक्तव्याला उपस्थितांनी दाद दिली.
अवश्य वाचा : भंडारदऱ्यात ‘थर्टी फर्स्ट’ला पोलिसांचा कडक बंदोबस्त
विखे म्हणाले की, या स्पर्धेतून चांगले फलंदाज गोलंदाज मिळाले आहेत. तसेही या तालुक्याला चांगल्या फलंदाजांची आवश्यकता आहे. समोरून कितीही आणि कसेही बाॅल आले तरी टोलावता आले पाहीजे. फिल्डिंगचे काम माझ्यावर सोडा, असे सांगतानाच जनार्दन आहेर यांना सल्ला देताना आता एकच कोणता तरी संघ निश्चित करा. आयपीएलसारखे संघ बदलू नका.आपले भविष्य घडविण्यासाठी निर्णय करण्याची वेळ आली असल्याचा मित्रत्वाचा सल्ला देवून एकप्रकारे भाजपात प्रवेश करण्याचे निमंत्रणच त्यांनी आहेर यांना दिले.