Ajit Pawar : आता मुलांच्या नावापुढे वडिलांआधी आईचे नाव लागणार; उपमुख्यमंत्री अजित पवार

Ajit Pawar : आता मुलांच्या नावापुढे वडिलांआधी आईचे नाव लागणार; उपमुख्यमंत्री अजित पवार

0
Ajit Pawar : आता मुलांच्या नावापुढे वडिलांआधी आईचे नाव लागणार; उपमुख्यमंत्री अजित पवार
Ajit Pawar : आता मुलांच्या नावापुढे वडिलांआधी आईचे नाव लागणार; उपमुख्यमंत्री अजित पवार

Ajit Pawar : नगर : “आतापर्यंत आपण मुलांच्या नावापुढे वडिलांचे नाव लागलेले पाहत आलो आहोत. परंतु, आता महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्या नेतृत्वाखाली चौथे महिला धोरण आणले आहे, ज्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. फार बारकाईने हे धोरण आणले गेले आहे. याआधी मूल जन्माला आल्यानंतर त्याच्या नावापुढे वडिलांचे (Father) नाव लावले जायचे. मुलाचे नाव, मग वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव लावले जायचे. आता आपण नवीन निर्णय घेतला आहे. इथून पुढे मुलाचे किंवा मुलीचे नाव, मग आईचे नाव(Mother Name), त्यानंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव लावले जाईल.”, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.

हे देखील वाचा : भंडारदऱ्यात ‌‘थर्टी फर्स्ट’ला पोलिसांचा कडक बंदोबस्त

बारामती येथे ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार केला. यावेळी ते बाेलताना म्हणाले, ”गेल्या काही वर्षांपासून अधिकृत कागदपत्रांवरही काही जणांनी आई आणि वडिलांची नावे लावण्याची पद्धत सुरू केली आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असल्याचे नेहमीच बोलले जाते. राज्यात लवकरच चौथे महिला धोरण आणले जाणार आहे. या धोरणानुसार आता मुलांच्या नावापुढे आईचे नाव लावण्याची तरतूद करण्यात आली आहे. एखाद्या पुरुषाने सदनिका विकत घेतली तर त्यावर सहा टक्के कर लावला जातो, जर महिलेच्या नावावर सदनिका घेतली तर केवळ पाच टक्के कर लावला जातो. त्यामुळे इथून पुढे पती घर घ्यायचा विचार करत असेल, तर पत्नीने पैसे वाचविण्यासाठी हा पर्याय पतीपुढे ठेवायला हरकत नाही, असेही अजित पवार मिश्किलपणे म्हणाले.”

नक्की वाचा : विकासामध्ये दहा वर्ष मागे नेलेला नगर जिल्हा पाच वर्ष पुढे नेला : सुजय विखे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here