Radhakrishna Vikhe Patil : खाेटं बाेल पण रेटून बाेल, हा शरद पवारांचा धंदा; मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी डागलं टीकास्त्र

Radhakrishna Vikhe Patil : खाेटं बाेल पण रेटून बाेल, हा शरद पवारांचा धंदा; मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी डागलं टीकास्त्र

0
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : खाेटं बाेल पण रेटून बाेल, हा शरद पवारांचा धंदा; मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी डागलं टीकास्त्र

Radhakrishna Vikhe Patil : नगर : तुम्हाला तुमच्या सोयीनुसार राजकारण (Politics) करायची मुभा आहे. त्यामुळेच तुम्हाला स्वकीय सोडून गेले. आता त्यांना आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. शरद पवार (Sharad Pawar) हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी त्यांच्या कन्येच्या विजयाची चिंता करावी. त्यांच्या वक्तव्यांना मी फारसं महत्त्व देत नाही. खोटं बोल पण रेटून बोल हा त्यांचा धंदा आहे, असं म्हणत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी (Radhakrishna Vikhe Patil) शरद पवारांवर टीकास्त्र डागलं. लाेणी येथे विखे पाटील बोलत होते.

हे देखील वाचा: लंकेंच्या उमेदवारीबाबत शरद पवारांचा माेठा गाैप्यस्फाेट

मंत्री विखे पाटील म्हणाले

”शरद पवारांनी बाळासाहेब विखेंपासून विरोध करण्याची परंपरा आजही कायम ठेवली आहे. नगर जिल्ह्यामध्ये नेत्या-नेत्यांमध्ये त्यांनी भांडणं लावायचं काम केलं. त्यामुळे जिल्ह्याची प्रगती झाली नाही. शरद पवारांनी नगर जिल्ह्यात जास्त सभा घ्याव्यात, हाच आमचा आग्रह आहे. त्यांनी जिल्ह्याचं कसं वाटोळं केलं हे त्यामुळे मला जाहीरपणे बोलता येईल.

नक्की वाचा: शिर्डी लाेकसभेसाठी बड्या नेत्याचा अर्ज; दिग्गजांची उपस्थिती

तुमचं अपयश तुम्ही मान्य करा (Radhakrishna Vikhe Patil)

स्वतःला राष्ट्रीय नेते समजतात आणि अवघे दहा उमेदवार तुम्हाला देता आले. काँग्रेसची हीच अवस्था आहे. स्वतःला नेते समजणाऱ्या थोरात यांना जिल्ह्यात एकही जागा घेता आली नाही. विखेंवर काय टीका करायची करा, मात्र तुमचं अपयश तुम्ही मान्य करा, असं म्हणत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here