Sujay Vikhe : मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित डॉ. सुजय विखे दाखल करणार उमेदवारी अर्ज

Sujay Vikhe : मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित डॉ. सुजय विखे दाखल करणार उमेदवारी अर्ज

0
Sujay Vikhe
Sujay Vikhe : मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित डॉ. सुजय विखे दाखल करणार उमेदवारी अर्ज

Sujay Vikhe : नगर: अहमदनगर लोकसभेसाठी (Lok Sabha) महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) पाटील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत २२ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती भाजपचे (BJP) शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर (Adv. Abhay Agarkar) यांनी दिली.

हे देखील वाचा: लंकेंच्या उमेदवारीबाबत शरद पवारांचा माेठा गाैप्यस्फाेट

आगरकर यांनी सांगितले की (Sujay Vikhe)

२२ एप्रिल रोजी डॉ. सुजय विखे पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालय येथे ११ वाजता आपला अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. त्याचबरोबर आमदार मोनिका राजळे, आमदार प्रा. राम शिंदे, जिल्हा बॅंकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले, माजी मंत्री तथा आमदार बबनराव पाचपुते, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार चंद्रशेखर कदम, माजी आमदार चंद्रशेखर घुले, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहटा, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बाबुशेठ टायरवाले, अनिल शिंदे यांच्यासह सर्व मित्र पक्षाचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

Abhay Aagarkar
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित डॉ. सुजय विखे दाखल करणार उमेदवारी अर्ज

नक्की वाचा: शिर्डी लाेकसभेसाठी बड्या नेत्याचा अर्ज; दिग्गजांची उपस्थिती

नगर शहरात निघणार रॅली (Sujay Vikhe)

नगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवाद करून रॅलीला सुरवात होणार आहे. माळीवाडा वेस येथून विशाल गणपतीचे दर्शन घेत, पंच पीर चावडी मार्गे माणिक चौक, भिंगारवाला चौक, तेलीखुंट, चितळे रोड, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, दिल्लीगेट ते निलक्रांती चौक येथे मिरवणुकीची सांगता होईल. यावेळी भाजप, महायुती आणि घटक पक्ष, मित्र पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे आगरकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here