Deepika Padukone : दीपिका पदुकोणने दिली ‘सिंघम अगेन’ मधील आयकॉनिक पोझ 

सोशल मीडियावर दीपिकाचा लेडी सिंघम लूक जोरदार व्हायरल होत असून तिचा हा चित्रपटातला दुसरा लूक आहे. यापूर्वीही दीपिकाचे चित्रपटातील काही लूक व्हायरल झाले होते.

0
Deepika Padukone
Deepika Padukone

नगर : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचे (Ajay Devgan) ‘सिंघम’ आणि ‘सिंघम २’ (Singham 2) दोन्हीही चित्रपट हिट ठरले. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटामध्ये, अजय देवगणसोबत पोलिसांच्या भूमिकेत दीपिका पदुकोणही दिसणार आहे. नुकतंच अभिनेत्री दीपिका पदुकोणचा चित्रपटातील लूक दिग्दर्शक रोहित शेट्टीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सध्या तिच्या ह्या डॅशिंग लूकची जोरदार चर्चा होत आहे.

नक्की वाचा :परंपरा’ चित्रपटाचा आशयघन ट्रेलर प्रदर्शित;आयुष्य व परंपरेतील संघर्ष रुपेरी पडद्यावर

दीपिकाचा लेडी सिंघम लूक व्हायरल (Deepika Padukone)

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाची सध्या शूटिंग सुरू आहे. दीपिका पदुकोण तिच्या खासगी आयुष्यामुळेही चांगलीच चर्चेत आहे. अभिनेत्री प्रेग्नेंट असूनही चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे. अशातच सध्या सोशल मीडियावर दीपिकाचा लेडी सिंघम लूक जोरदार व्हायरल होत असून तिचा हा चित्रपटातला दुसरा लूक आहे. यापूर्वीही दीपिकाचे चित्रपटातील काही लूक व्हायरल झाले होते. सिंघम अगेनमध्ये अजय देवगणसोबत मुख्य भूमिकेत रणवीर सिंह, करीना कपूर खान, दीपिका पदुकोण, श्वेता तिवारी, अक्षय कुमार, विकी कौशल, टायगर श्रॉफ मल्टिस्टार कास्ट पाहायला मिळेल. 

अवश्य वाचा : मी मनोज जरांगेंवर टीका केली नाही,केली तर शब्द मागे घेत नाही-पंकजा मुंडे

‘सिंघम अगेन’च्या नव्या पोस्टरमध्ये दीपिकाची आयकॉनिक पोझ (Deepika Padukone)

रोहित शेट्टीने नुकतंच दीपिकाचा चित्रपटातील लूक शेअर केलेला आहे. या फोटोमध्ये,रोहित शेट्टीने दीपिकाला हिरो म्हटलं आहे. ‘सिंघम अगेन’च्या नव्या पोस्टरमध्ये दीपिका अजयची आयकॉनिक पोझ देताना दिसत आहे. तर दीपिकाने डोळ्याला ब्लॅक गॉगल आणि अजयची वाघासारखी आयकॉनिक पोज देताना ती दिसते. “माझी हिरो, रीलमध्येही आणि रियलमध्येही. लेडी सिंघम”,असं कॅप्शन रोहितने दीपिकाचा फोटो शेअर करताना दिलेली आहे. रोहित शेट्टीने शेअर केलेल्या या नव्या पोस्टरवर दीपिकाने ‘Let’s Do This!’ म्हणत कमेंट केली आहे. #लेडीसिंघम #शक्तीशेट्टी असा ही हॅशटॅग वापरलाय. सध्या दीपिकाचा हा फोटो तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे.हा चित्रपट २०२४ मध्येच रिलीज होण्याची शक्यता आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here