Pankaja Munde: मी मनोज जरांगेंवर टीका केली नाही,केली तर शब्द मागे घेत नाही-पंकजा मुंडे

पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणासंबंधी वक्तव्य केल्यानंतर बीडमध्ये राजकारण चांगलच तापल्याचं दिसतंय. त्यानंतर आपण मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली नसल्याचे स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिल आहे.

0
Pankaja Munde
Pankaja Munde

नगर : मी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली नाही आणि जर टीका केली तर कधीच शब्द मागे घेत नाही, मी गोपीनाथ मुंडेंची औलाद आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या. गेवराई तालुक्यातील उमापूर येथे प्रचार सभेत पंकजा मुंडे (Pankaja Munde) बोलत होत्या. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार अशी लढत असलेल्या बीडमध्ये आता मनोज जरांगे (Manoj Jarange) विरुद्ध पंकजा मुंडे यांच्या वादाची चर्चा सुरू आहे. पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणासंबंधी वक्तव्य केल्यानंतर बीडमध्ये राजकारण चांगलच तापल्याचं दिसतंय. त्यानंतर आपण मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली नसल्याचे स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिल आहे.

नक्की वाचा : केएल राहुल, डी कॉक पडले भारी; लखनौचा चेन्नईवर ८ गडी राखून दणदणीत विजय  

मी मनोज जरांगे पाटलाचं नाव देखील घेतलं नाही – पंकजा मुंडे (Pankaja Munde)

भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे म्हणाल्या की, वर्षभरात मी मनोज जरांगे पाटलाचं नाव देखील घेतलं नाही. मला ज्याच्यावर बोलायचं आहे. मी त्याच्यावर मोठ्या आवाजात बोलते आणि मी जर टीका केली तर कधीच शब्द मागे घेत नाही, मी गोपीनाथ मुंडेंची औलाद आहे. गरिबांसाठी आंदोलन करणाऱ्या जरांगे पाटलावर मी टीका केली नाही. मला वंचितांसाठी आणि पीडितांसाठी काम करायचं आहे, वंचित आणि पीडितांची वाली होईन, अशी शपथ मी गोपीनाथ मुंडे यांच्या चितेवर घेतली होती. वंचितांच्या बाजूने उभे राहण्यासाठी मी कोणालाही घाबरत नसल्याचं यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या.

अवश्य वाचा : ‘परंपरा’ चित्रपटाचा आशयघन ट्रेलर प्रदर्शित;आयुष्य व परंपरेतील संघर्ष रुपेरी पडद्यावर

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे ? (Pankaja Munde)

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, उपोषण करून कुणाला आरक्षण मिळत नसतं. त्यासाठी विधानसभा, संसदेत कायदा करावा लागतो. त्यासाठी निवडून आलेल्या लोकांना आरक्षणाचा प्रश्न सोडवता येतो. उपोषण केल्याने त्याचा काही फायदा होत नाही. मात्र आता पुन्हा पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याने चर्चेला उधाण आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here