Radhakrishna Vikhe Patil : ‘ईव्हीएम’बाबत राधाकृष्ण विखे पाटलांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

Radhakrishna Vikhe Patil : 'ईव्हीएम'बाबत राधाकृष्ण विखे पाटलांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

0
Radhakrishna Vikhe Patil : 'ईव्हीएम'बाबत राधाकृष्ण विखे पाटलांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
Radhakrishna Vikhe Patil : 'ईव्हीएम'बाबत राधाकृष्ण विखे पाटलांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

Radhakrishna Vikhe Patil : नगर : नुकत्यात मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान झालेल्या निवडणुकीत भाजपला (BJP) घवघवीत यश मिळाले. मात्र, भाजपच्या तीन राज्यातील यशावर विराेधी पक्षातील नेत्यांनी ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तर दम असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, असे आव्हानच सरकारला दिले. त्यावरून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी उद्धव ठाकरे यांना स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही, ते बॅलेट पेपरवर निवडणुका (Elections) घ्यायची भाषा करतात. त्यांच्या बाेलण्यावर कीव येत असल्याची टीका केली आहे.

हे देखील वाचा : आशुतोष काळे यांच्यामागे खंबीरपणे उभे राहू’ – राधाकृष्ण विखे पाटील

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नगरच्या कोपरगावात विविध विकासकामांचे उद्घाटन झालं. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ईव्हीएम-बॅलेट पेपरच्या मुद्द्यावरून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. मंत्री विखे पाटील म्हणाले, ” ‘सर्व राजकीय पक्षाकडून विधाने सुरू आहेत, ती बौद्धिक दिवाळखोरी आहे. तेलंगणाच्या बाबतीत काही शंका आहे का? ज्यांना जनाधार राहिला नाही. आपला पक्ष सांभाळता आला नाही. आमदार सोडून गेलेत. त्यांनी ईव्हीएम, बॅलेट बाबत बोलणे म्हणजे त्यांची कीव येत आहे’, अशी टीका विखे पाटील यांनी केली.

नक्की वाचा : नेवासा वकील संघाचा रास्ता रोकोचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here