Radhakrishna Vikhe Patil : मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा जनता दरबार हाऊसफुल्ल

मंत्री विखे पाटील यांनी लोणी येथील आपल्‍या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन केले होते.

0

नगर : जनता दरबाराच्‍या माध्‍यमातून सामान्‍य माणसांची कामे मार्गी लागावीत हाच प्रयत्‍न असतो. गेली अनेक वर्षांपासून ही परंपरा मी सुरु ठेवली आहे, असे जनता दरबार (Janata Durbar) सर्वांनीच घेतले तर, शासन (Government) व्‍यवस्‍थेवरचा विश्‍वास अधिक दृढ होईल आणि या माध्‍यमातून पारदर्शकताही समोर येण्‍यास मदत होत असल्‍याची भावना महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्‍यक्‍त केली.

हे देखील वाचा : कुणबी नोंदी राज्यभर शाेधा; युद्धपातळीवर काम करा, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मंत्री विखे पाटील यांनी लोणी येथील आपल्‍या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन केले होते. जिल्‍ह्यासह संपूर्ण राज्‍यातून मोठ्या संख्‍येने आलेल्‍या नागरिकांचे अर्ज स्विकारुन त्‍यांच्‍या समस्‍या त्‍यांनी जाणून घेतल्‍या. तसेच विविध संघटनांच्‍या शिष्‍टमंडळांशीही चर्चा करुन, त्‍यांच्‍या प्रश्‍नांबाबत शासन स्‍तरावर पाठपुरावा करण्‍याची ग्‍वाही त्‍यांनी दिली. जनता दरबार ही विखे पाटील यांची संकल्‍पना गेल्‍या अनेक वर्षांपासून सुरु आहे. सत्ता असो अथवा नसो नागरिकांच्‍या प्रश्‍नांसाठी महिन्‍यातून एक वेळा मंत्री विखे पाटील जनता दरबारचे आयोजन करुन नागरिकांशी संवाद साधत असतात. सर्वच शासकीय विभागांचे आधिकारीही उपस्थित राहून, नागरिकांच्‍या प्रश्‍नांबाबत तातडीने निर्णय करतात. या जनता दरबारातील या संवादात्‍मक प्रक्रियेतून नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्‍यासाठी मोठी मदत होते.

नक्की वाचा : वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर हार्दिक पांड्याने दिली पहिली प्रतिक्रिया

महसूल मंत्री झाल्‍यानंतर मंत्री विखे पाटील यांनी मागील वर्षभरात १० जनता दरबार आयोजित केले. यापैकी नगर, राहाता, राहुरी या ठिकाणी ३ जनता दरबार झाले. या जनता दरबारच्‍या माध्‍यमातून वर्षभरात १७ हजार ३०४ अर्ज स्विकारण्यात आले. यापैकी ९ हजार २७६ अर्जांवर कार्यवाही होऊन त्‍यांची उत्तरही वेगवेगळ्या शासकीय विभागाकडून नागरिकांना मिळाले आहेत. उर्वरित ८ हजार २८ अर्ज प्रक्रियेमध्ये असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

प्राप्‍त होणाऱ्या अर्जांवर माझ्या जनसंपर्क कार्यालयातून सातत्‍याने पाठपुरावा होतो. संबधित अर्जदाराला पत्रही दिले जाते. शासकीय कार्यालयांकडे पाठविलेल्‍या अर्जांवर झालेल्‍या कार्यवाहीचा पाठपुरावाही होत असल्‍याने नागरिकांची कामे मार्गी लावण्‍यात मोठी मदत होते. शासकीय कार्यालयांमधून प्रत्‍येक अर्जावर होणाऱ्या कार्यवाहीचा रिपोर्टही दर महिन्‍याला आपण मागवत असल्‍याचे मंत्री विखे पाटील यांनी माध्‍यमांशी बोलताना सांगितले.