Indian 2 Teaser Out : सुपरस्टार कमल हासनच्या ‘हिंदुस्तानी २’ चा टीझर प्रदर्शित 

कमल हासनचा आगामी चित्रपट 'इंडियन-2'चा टीझर रिलीज झाला आहे.

0
210

नगर : दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासनचा (kamal Hasan) आगामी चित्रपट ‘इंडियन-2’ (Indian-2) चा टीझर रिलीज झाला आहे. शुक्रवारी (ता. ३) सुपरस्टार रजनीकांत यांनी ट्विटरवर या चित्रपटाचा टीझर लाँच केला. ‘इंडियन इज बॅक’ असं म्हणत त्यांनी हा टिझर शेअर केला आहे.

नक्की पहा : मोठी बातमी ! हार्दिक पांड्या विश्वचषकातून बाहेर

इंडियन चित्रपटाचा पहिला भाग जिथे संपतो तिथूनच चित्रपटाचा टीझर सुरू होतो. चित्रपटात, कमलच्या सेनापती म्हणजेच हिंदुस्थानी या व्यक्तिरेखेने वचन दिले होते की, जिथे अन्याय होईल तिथे तो नक्कीच येईल आणि त्याने ते वचन पाळलेले दिसत आहे. संपूर्ण देश भ्रष्टाचाराने ग्रस्त असून कमबॅक इंडियन अशी डिजिटल मोहीम सुरू असल्याचे टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे. टीझरच्या शेवटच्या भागात हिंदुस्थानी परत येतो.

अवश्य वाचा : वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर हार्दिक पांड्याने दिली पहिली प्रतिक्रिया

या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ एका सामान्य माणसाच्या भूमिकेत  तर बॉबी सिम्हा हा पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला. प्रिया भवानी शंकर पत्रकाराच्या भूमिकेत दिसत आहे. काही सेकंदांच्या टीझरमध्ये रकुल प्रीत सिंहची झलक देखील दाखवण्यात आली आहे. ‘इंडियन-2’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन शंकर यांनी केले आहे. या चित्रपटाचा टीझर रजनीकांतनेच नव्हे तर आमिर खान, एसएस राजामौली, किच्चा सुदीप आणि मोहनलाल यांनीही लॉन्च केला. प्रत्येकाने वेगवेगळ्या भाषांमध्ये चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. ‘इंडियन-2 च्या निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केलेली नाही. मात्र पुढील वर्षाच्या सुरुवातीला हा चित्रपट प्रदर्शित होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.