Hardik pandya : वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर हार्दिक पांड्याने दिली पहिली प्रतिक्रिया

टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या वर्ल्ड कप २०२३ मध्ये आता खेळू शकणार नाही. हार्दिक पांड्याने आता यावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

0
226

नगर : वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) टीम इंडियाने (Team India) दमदार कामगिरी करत आपलं सेमीफायनलचे तिकीट पक्के केलं आहे. मात्र यादरम्यान चाहत्यांची निरक्षण झाली आहे. कारण टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) वर्ल्ड कप 2023 मध्ये आता खेळू शकणार नाही.

नक्की पहा : मोठी बातमी ! हार्दिक पांड्या विश्वचषकातून बाहेर

हार्दिक पांड्याने आता यावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे. विश्वचषकातील उरलेल्या भागाला मी मुकणार हे सत्य पचवायला हवे. मात्र मी मनाने टीमसोबतच असेन असं हार्दिक पांड्याने म्हटलं आहे. “मी वर्ल्ड कपच्या उर्वरित सामन्यात प्रत्येक चेंडूवर त्यांचा उत्साह वाढवीन. तुमच्या सदिच्छा, प्रेम आणि समर्थनासाठी मनापासून आभार. हे अविश्वसनीय आहे. ही टीम विशेष आहे. प्रत्येकाला अभिमान वाटेल अशी कामगिरी आपण करु हा मला विश्वास आहे” असं हार्दिक पांड्याने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलय.

अवश्य वाचा : ‘झिम्मा २’ मधील रिंकू राजगुरूच्या पात्राचे नाव आले समोर  

बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात खेळताना हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. त्यानंतर हार्दिक पांड्या 2-3 सामन्यात खेळणार नाही, असं चाहत्यांना वाटलं होतं. पण त्याची दुखापत गंभीर होती. त्याच्याजागी सूर्यकुमार यादवचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. मात्र आता सेमीफायनलमध्ये हार्दिकच बाहेर होण टीम इंडियासाठी झटका आहे. कारण टीमला हार्दिकच्या जागी दोन खेळाडूंचा समावेश करावा लागतो. हार्दिक पांड्या सहाव्या नंबरवर फलंदाजीसाठी येत असल्याने कॅप्टनला त्याच्यामुळे सहाव्या गोलंदाजाचा पर्याय मिळायचा. मात्र आता हार्दिक टीममध्ये नसतानाही टीम इंडिया काय कामगिरी करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.