नगर : केंद्रात इंडिया आघाडीचं सरकार आल्यास देशात जातीनिहाय जनगणना (Caste wise census) केली जाईल आणि आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा हटवली जाईल,अशी घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणूकीपूर्वी (loksabha election) ही मोठी घोषणा केली आहे. रांची येथील शहीद मैदानावर झालेल्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आयोजित रॅलीला संबंधित करताना राहुल गांधी यांनी हे आश्वासन दिलं आहे. राहुल गांधी यांनी भाजप सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्यावर देखील जोरदार टीका केली.
नक्की वाचा : अखेर शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध
जातीय जनगणना करण्याची मागणी होत आहे (Rahul Gandhi On Reservation)
माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, जातीय जनगणना करण्याची मागणी होत आहे. ओबीसी, दलित आणि आदिवासींना अधिकार देण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान म्हणतात की, कोणतीही जात अस्तित्वात नाही,जेव्हा मतं मागण्याची वेळ येते तेव्हा पंतप्रधान म्हणतात की ते ओबीसी आहेत. मात्र जेव्हा जातीनिहाय जनगणनेची मागणी केली की ते सांगतात की फक्त दोन जात आहेत. गरीब आणि श्रीमंत.
अवश्य वाचा : अदा शर्माच्या ‘बस्तर द नक्सल स्टोरी’चा टीझर प्रदर्शित
दलित,आदिवासी आहेत त्यांच्या आरक्षणात कुठलीही कमतरता येणार नाही (Rahul Gandhi On Reservation)
राहुल गांधी यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून या सभेचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये राहुल गांधी म्हणतात की, आजकाल ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण मिळू शकत नाही. हे पन्नास टक्क्यांच लिमीट काँग्रेस आणि इंडिया आघाडीचं सरकार काढून फेकून देईल.जे दलित,आदिवासी आहेत. त्यांच्या आरक्षणात कुठलीही कमतरता येणार नाही, याची मी गॅरंटी देतो, मागास घटकांना त्यांचा अधिकार मिळेल. हा देशातील सर्वात मोठा प्रश्न आहे. दलित,आदिवासी यांना बॉडिंग लेबर बनवलं जात आहे. मोठ्या कंपन्यात, रुग्णालयात, कोर्टामध्ये, शाळा महाविद्यालयात यांची कुठलीच भागिदारी नाहीये असेही ते म्हणाले. आमचं पहिलं पाऊल जातनिहाय जनगणना करणे हे असेल असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं आहे.