Bastar The Naxal Story: अदा शर्माच्या ‘बस्तर द नक्सल स्टोरी’चा टीझर प्रदर्शित

अदा शर्मा आता लवकरच 'बस्तर द नक्षल स्टोरी' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे.

0
Bastar The Naxal Story
Bastar The Naxal Story

नगर : द केरळ स्टोरी’ (The Kerala Story Movie) या चित्रपटामुळे अभिनेत्री अदा शर्मा (Actress Adah Sharma) चांगलीच प्रसिद्धी झोतात आली. या चित्रपटानंतर अदा शर्मा आता लवकरच ‘बस्तर द नक्षल स्टोरी’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे. अवघ्या काही तासांतच या टीझरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

नक्की वाचा : अखेर शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध

‘बस्तर द नक्सल स्टोरी’ चा टीझर रिलीज (Bastar The Naxal Story)

विपुल अमृतलाल शाह निर्मित आणि सुदीप्तो सेन दिग्दर्शित अदा शर्माच्या ‘बस्तर द नक्सल स्टोरी’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटाची प्रेक्षक वाट पाहत आहेत. आता निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. या चित्रपटाचा टीझर पाहून चाहत्यांच्या मनातील उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट येत्या १५ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

अवश्य वाचा : ‘भक्षक’मध्ये सई ताम्हणकर साकारणार पोलिसाची भूमिका 

अदा शर्मा नीरजा माधवनच्या भूमिकेत दिसणार (Bastar The Naxal Story)

या चित्रपटात अदा शर्मा नीरजा माधवनच्या भूमिकेत दिसणार आहे. अदा शर्माने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. तिने कॅप्शनमध्ये असे लिहिले की, ‘निर्दोष लोकांच्या रक्ताने लाल रंगाची कथा! अनटोल्ड स्टोरी कॅप्चर करा.बस्तर- नक्षलवादी कथा. आता टीझर आऊट!’ अवघ्या दोन महिन्यांत या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले. सनशाईन पिक्चर्सच्या बॅनरखाली अशिन ए. शाह यांची सहनिर्मिती असलेला हा चित्रपट आहे. येत्या १५ मार्चला या चित्रपटातून अदाची नवी भूमिका पाहायला मिळणार आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here