Rahul Gandhi :भारतीय तरुणांचे सात ते आठ तास फेसबुक व इंस्टाग्रामवर : राहुल गांधी

Rahul Gandhi : भारतातले तरुण दिवसातले सात ते आठ तास मोबाइलवर फेसबुक आणि इंस्टाग्राम पाहण्यात घालवतात, असं वक्तव्य काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे.

0
Rahul Gandhi

नगर : भारतातले तरुण (Youth Of India) दिवसातले सात ते आठ तास मोबाइलवर फेसबुक (Facebook) आणि इंस्टाग्राम (Instagram) पाहण्यात घालवतात, असं वक्तव्य काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलं आहे. काँग्रेस पक्षाच्या १३९ व्या स्थापनादिनाच्या निमित्ताने गुरुवारी नागपुरात (Nagpur) दिघोरी नाक्याजवळील मैदानात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत राहुल गांधी बोलत होते.

नक्की वाचा : तलाठी भरतीचा निकाल ‘या’ महिन्यात लागणार  

आपल्या देशात मोठी युवाशक्ती आहे. मात्र या युवकांची ही शक्ती पूर्णपणे वाया घालवली जाते आहे. आजचे तरुण हे नोकरी करत नाहीत कारण त्यांच्यासाठी नोकऱ्याच नाहीत. त्यामुळे या तरुणांचे दिवसातले सात ते आठ तास हे मोबाइल फोनवर इंस्टाग्राम आणि फेसबुक पाहण्यात जातात. हे भारतातलं वास्तव असल्याचे राहुल गांधींनी सांगितले आहे.

अवश्य वाचा : राम अक्षदा कलशाचे हंडीनिमगाव येथे उत्स्फूर्त स्वागत

राहुल गांधी म्हणाले की, काही दिवसांपूर्वी माझ्याकडे काही तरुण आले होते ते म्हणाले, अग्निवीर योजनेच्या आधी आम्हाला लष्करात घेण्यात आलं होतं. दीड लाख तरुणांना भारताच्या लष्कराने आणि वायुसेनेने घेतलं होतं. त्यांच्या नोकरीला मंजुरीही मिळाली होती. मात्र मोदी सरकारने अग्निवीर योजना आणली आणि या दीड लाख तरुणांना नोकरीत घेतलंच नाही. देशप्रेमामुळे हे सगळे तरुण लष्करात आणि वायुसेनेत नोकरी करायला गेले होते.सरकारने आमची खिल्ली उडवल असल्याचे या तरुणांनी सांगितले. आमच्या गावात आमची चेष्टा केली जाते. हा अनुभव राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात सांगितला. त्यांना अग्निवीर योजनेतूनही नोकऱ्या दिल्या गेल्या नाहीत थेट घरी पाठवलं. असाही आरोप राहुल गांधी यांनी भाषणात म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here