कामात सुधारणा न केल्यास रास्ता रोको करणार; माजी आमदार राहुल जगताप यांचा इशारा
Rahul Jagtap : श्रीगोंदा : तालुक्यातील घारगाव पिंपळगांव मार्गे ढवळगाव रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या आरोपातून घारगाव सरपंच (Sarpanch) रमेश खोमणे आणि ग्रामस्थांनी माजी आमदार राहुल जगताप (Rahul Jagtap) यांच्या उपस्थितीत काम बंद पाडले (Work stopped).
हे देखील वाचा : डिजेने तिघांना चिरडले; दोघांचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी
यावेळी सार्वजानिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना रस्त्याच्या संदर्भात फोनवरून फैलावर घेत दर्जेदार काम करण्याची सूचना करत कामात सुधारणा नाही झाली तर सोमवारी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला.
नक्की वाचा : जिल्हा प्रशासन मिशन माेडवर; मराठा सर्वेक्षणासाठी जिल्ह्यात वीस हजार कर्मचाऱ्यांची हाेणार नियुक्ती
मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या घारगाव पिंपळगांव मार्गे ढवळगाव रस्त्याचे मागील काही वर्षांपासून रखडलेल्या कामासाठी आमदार बबनराव पाचपुते यांनी दोन टप्प्यात पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करत कामास सुरुवात झाली. रस्त्याच्या कामासाठी काळ्या मातीचा वापर ठेकेदाराने सुरू केल्याने नागरिकांनी ओरड करताच ठेकेदाराने कामात काळी माती वापरण्याचे बंद करत काम सुरू केले. रस्त्यावर अंथरलेल्या खडीवर पुरेसे डांबर न वापरता काम सुरू ठेवण्याचा घाट घालत केलेले खडीकरण अवघ्या दोन दिवसात उचकटून खडी गोळा झाल्याने घारगाव सरपंच रमेश खोमणे तसेच नागरिकांनी आक्रमक होत रस्त्याचे काम बंद पाडत संताप व्यक्त केला. यावेळी उपस्थित असणाऱ्या माजी आमदार राहुल जगताप यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत रस्त्याच्या कामात सुधारणा न केल्यास येत्या सोमवारी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी रमेश खोमणे, सुनिल कळमकर, शरद कळमकर, राजाराम महाडिक मेजर, राहुल कळमकर, संदिप थिटे, सरोदे भैय्या आदी उपस्थित होते.