Wagh Nakhe: शिवरायांची वाघनखं महाराष्ट्रात येण्यास विलंब;ब्रिटन सरकारकडून प्रक्रिया सुरु

Wagh Nakhe : ज्या वाघनखांच्या साहाय्याने शिवरायांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा वध केला. ती वाघनखं आता महाराष्ट्रात थेट एप्रिल किंवा मे मध्ये दाखल होणार आहेत. अशी माहिती समोर आली आहे.

0
शिवरायांची वाघनखं

Wagh Nakhe : नगर : ज्या वाघनखांच्या (Wagh Nakhe) साहाय्याने शिवरायांनी (Shivaji Maharaj) स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा वध केला. ती वाघनखं आता महाराष्ट्रात थेट एप्रिल किंवा मे मध्ये दाखल होणार आहेत.अशी माहिती समोर आली आहे. यापूर्वी नोव्हेंबर महिन्यातचं ही वाघनखं महाराष्ट्रात येणार असल्याचा दावा,मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केला होता मात्र, ब्रिटन सरकारकडून (British Government) प्रक्रिया सुरु असल्याने याला ही वाघनखे महाराष्ट्रात येण्यास विलंब झाला आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी ही वाघनखं महाराष्ट्रात आणण्याचा राज्यसरकारचा प्रयत्न आहे.

नक्की वाचा : काँग्रेसने ४८ जागांवरील इच्छुकांची मागवली नावे; मित्रपक्ष बुचकळ्यात

छत्रपती शिवाजी महाराजांनी १५ नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला होता.शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध ज्या वाघनखांनी केला होता, ती वाघनखं ब्रिटनमधून परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार आग्रही आहे. ती वाघनखं सध्या ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अॅल्बर्ट संग्रहालयात आहेत. तीच वाघनखे महाराष्ट्रात आणायचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार करत आहे.

अवश्य वाचा : घारगाव पिंपळगांव पिसा रस्त्याचे काम पाडले बंद

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासाठी मुनगंटीवार यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये व्हिटोरिया अल्बर्ट वस्तुसंग्रहालयाशी सामंजस्य करार केला होता. नोव्हेंबर २०२३ पासून तीन वर्षे ही वाघनखे भारतात राहतील, असे त्यात नमूद करण्यात आले होते. त्यानंतर जानेवारीचा वायदा करण्यात आला.  मात्र जानेवारीतही ही वाघनखे भारतात येणार नाहीत. त्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन मार्च किंवा एप्रिलमध्ये वस्तुसंग्रहालयाशी राज्य सरकारचा करार होईल आणि मे अखेरीपर्यंत ती मुंबईत येतील, असे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

ही वाघनखे आणण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक खात्याची गेल्या आठवड्यात मंजुरी मिळाली आहे. मात्र  सध्या हे प्रकरण परराष्ट्र खात्याच्या मंजुरीसाठी प्रलंबित आहे. वस्तुसंग्रहालयाकडूनही ब्रिटिश सरकारच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. केंद्र सरकार व ब्रिटिश सरकारच्या मंजुरी मिळाल्यानंतर यासंदर्भातील करार होऊन ही  वाघनखे भारतात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here