Collector Office : आता जिल्हाधिकारी कार्यालयात विनाहेल्मेट प्रवेशास बंदी

Collector Office : आता जिल्हाधिकारी कार्यालयात विनाहेल्मेट प्रवेशास बंदी

0
Collector Office : आता जिल्हाधिकारी कार्यालयात विनाहेल्मेट प्रवेशास बंदी
Collector Office : आता जिल्हाधिकारी कार्यालयात विनाहेल्मेट प्रवेशास बंदी

Collector Office : नगर : वाहन चालविताना हेल्मेटचा (helmet) वापर करणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकाेनातून महत्वाचे आहे. बहुतांशी दुचाकी वाहनांच्या अपघातांमध्ये मृत पावणारे वाहनस्वार हे हेल्मेटशिवाय प्रवास करणारे असल्याचे दिसून आले आहे. हेल्मेट वापरण्यासंबंधी प्रबोधनात्मक व अंमलबजावणीविषयक व्यापक मोहीम नगर जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) विनाहेल्मेट दुचाकीवर प्रवेश करणाऱ्यास प्रतिबंध (Entry ban) करण्यात आला आहे, असे जिल्हाधिकारी (Collector) सिद्धाराम सालीमठ यांनी सांगितले.

हे देखील वाचा : काँग्रेसने ४८ जागांवरील इच्छुकांची मागवली नावे; मित्रपक्ष बुचकळ्यात

जिल्ह्यात यंदा घडलेल्या एकूण रस्ते अपघातांमध्ये दुचाकी व पादचाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आलेले आहे. या अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात हे फक्त दुचाकी व पादचाऱ्यांचे आहेत. मोटार वाहन कायद्यानुसार हेल्मेट वापरासंबंधी तरतुदीचा भंग करणाऱ्या दंडाची तरतूद आहे. विनाहेल्मेट दुचाकी चालविणे किंवा चालविण्यात संमती देणे अशा दोघांवरही जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. त्यामुळे कलम १९४ ड मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयात विनाहेल्मेट दुचाकीवर प्रवेश करणाऱ्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

नक्की वाचा : ईव्हीएम मशिन हटवा, लाेकशाही वाचवा; बॅलेटपेपरवर निवडणुका घेण्याची विराेधकांची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here