Manoj Jarange : मनोज जरांगेचा मुंबईत मोर्चा ; संयोजकांकडून स्थळ पहाणी

Manoj Jarange : मनोज जरांगे यांचा हा पायी मोर्चा अंतरवाली सराटी ते मुंबई असा असून या पायी मोर्चामध्ये लाखो मराठा समाज बांधव सहभागी होणार आहेत .

0
Manoj jarange March on foot

Manoj Jarange: पाथर्डी : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांनी मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे,यासाठी २६ जानेवारीला पायी मोर्चाचे (March on foot) आयोजन केले आहे. या प्रवासात त्यांच्या मुक्कामासह नाश्त्याची, जेवणाची सोय नेमकी कुठे व कशी करावी या अनुषंगाने त्यांच्या संयोजक मंडळीने पाथर्डीतील येळी, फुंदे टाकळी फाटा, तिसगाव, करंजी, मराठवाडी पर्यंतचा पाहणी दौरा (Inspection Tour) केला आहे. या संदर्भात येत्या दोन दिवसात नियोजन केले जाणार आहे.

नक्की वाचा : शिवरायांची वाघनखं महाराष्ट्रात येण्यास विलंब;ब्रिटन सरकारकडून प्रक्रिया सुरु

मनोज जरांगे यांचा हा पायी मोर्चा अंतरवाली सराटी ते मुंबई असा असून या पायी मोर्चामध्ये लाखो मराठा समाज बांधव सहभागी होणार आहेत. २० जानेवारीला जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथून मराठा समाज बांधवांसह मुंबईकडे मार्गस्थ होणार आहेत. त्यांचा प्रवास पाथर्डी नगर रस्त्याने पुढे नगर पुणे हायवे ते मुंबईकडे असा असेल. त्यांच्यासोबत लाखो मराठा बंधू भगिनी सहभागी होणार आहेत. 

अवश्य वाचा : घारगाव पिंपळगांव पिसा रस्त्याचे काम पाडले बंद

या सर्वांची प्रवासाच्या निमित्ताने व्यवस्था कुठे आणि कशी करायची याविषयी शुक्रवार (ता.५) जो धावता दौरा झाला. यामध्ये अंतरवाली सराटीचे सरपंच श्रीराम कुरमकर, सामाजिक कार्यकर्ते सचिन मोटे, माजी सभापती विष्णुपंत अकोलकर, नगरसेवक महेश बोरुडे, नामदेव लबडे, माजी सभापती काशिनाथ लवांडे, अकील लवांडे, अंबादास शिंदे, सुनील लवांडे यांच्यासह निवडुंगे, तिसगाव, करंजी, दगडवाडी, भोसे, सातवड, मराठवाडी येथील मराठा समाज बांधव देखील या दौऱ्याचे नियोजन करण्यासंदर्भात संयोजकांच्या मदतीसाठी सरसावले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here