Raigad : कर्जत : सर्व सामाजिक संघटना कर्जतच्या श्रमप्रेमीनी तीन दिवसीय “कर्जत ते किल्ले रायगड” (Raigad) पर्यावरण संवर्धन सायकल रॅलीचे (cycle rally) आयोजन केले होते. या सायकल रॅलीत बाल श्रमप्रेमीसह ज्येष्ठ नागरिक सायकल प्रेमींनी देखील यात सहभाग नोंदवत किल्ले रायगडावर पर्यावरण संवर्धन (Environmental Conservation) आणि स्वच्छतेचा संदेश दिला. किल्ले रायगडावर २५ गोण्या प्लास्टिक गोळा करीत स्वच्छता राखण्याचे आवाहन केले.
हे देखील वाचा: हिंदुराष्ट्रासाठी घटनेत दुरुस्ती करा; बागेश्वर धाम सरकार यांची सनसनाटी मागणी
कर्जत शहर स्वच्छ, सुंदर व हरीत करण्यासाठी मागील सव्वा तीन वर्षापासून (११५० दिवस) दररोज नित्य-नियमाने श्रमदान करून स्वच्छता, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन तसेच जनजागृती करण्याचे काम कर्जत येथील ध्येयवेडे सर्व सामाजिक संघटनेचे श्रमप्रेमी करीत आहे. आजतागायत जवळपास ८० हजार पेक्षा अधिक झाडे लावत ते जगवण्याच काम या संघटनेचे सर्व श्रमप्रेमी यांनी पार पाडले आहे. या सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून दरवर्षी दोन पर्यावरण पूरक संवर्धन जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन केले जाते.
नक्की वाचा : राज्यात आणखी ‘२०’ हजार शिक्षकांची भरती होणार
यंदा १६, १७ आणि १८ नोव्हेंबर रोजी तीन दिवसीय “कर्जत ते किल्ले रायगड” सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण २१ सायकल प्रेमीनी सहभाग घेतला होता. सायकल रॅलीने पहिल्या दिवशी १५० किमी, दुसऱ्या दिवशी १२० किमीचा घाटांचा प्रवास करीत तिसऱ्या दिवशी उर्वरित दहा किमीचा सायकलने प्रवास करीत किल्ले रायगडच्या चढाईचे काम यशस्वीरीत्या पार पाडले. या अखंड प्रवासात “झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरण वाचवा सायकलचा वापर करा, प्रदूषण टाळा. प्लास्टीकचा वापर कमी करा आणि कापडी पिशवीचा वापर करा” असा संदेश देण्यात आला. प्रवासाच्या टप्प्यावर स्थानिक पर्यावरण प्रेमींनी चहा, नाश्ता, जेवण, तसेच मुक्कामाची चांगली व्यवस्था कर्जतच्या सायकल प्रेमींसाठी केली होती. तसेच पुणे ग्रामीण व पुणे शहर पोलिसांनी सायकल रॅलीच्या सुखकर प्रवासासाठी वाहतूक कोंडीतून वाट मोकळी करून देत सुखरूप-पणे रायगडावर पोहचवण्यात मोलाचे सहकार्य केले. गड चढाई करताना तसेच गडावर पोहोचल्यानंतर तब्बल २५ गोण्या प्लास्टिक गोळा करीत स्वच्छतेचे काम श्रमप्रेमींनी रायगडावर पार पाडले.