Rajya Sabha Elections: राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक जाहीर

राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ६ जागांचा समावेश आहे.

0
Rajyasabha Elections
Rajyasabha Elections

नगर : राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक (Election) जाहीर करण्यात आली आहे. देशभरातील १५ राज्यातील ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) ६ जागांचा समावेश आहे. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) आज (ता. २९) यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.

नक्की वाचा : राहुल नार्वेकरांची पक्षांतरबंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

१३ राज्यांतील ५० राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ २ एप्रिलला संपणार (Rajya Sabha Elections)

१३ राज्यांतील ५० राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपणार आहे. तर दोन राज्यांतील उर्वरित सहा सदस्य ३ एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत. त्या ठिकाणच्या निवडणुका २७ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आल्या आहेत. ज्या राज्यांमध्ये राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, कर्नाटक, उत्तराखंड, छत्तीसगड, ओडिशा, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश यांचा समावेश आहे.

अवश्य वाचा : साेशल मीडियावर गप्पा ठाेकण्यापेक्षा सरकारी दरबारी हुशारी दाखवा; विरोधकांच्या टीकेवर मनोज जरांगेंचं चोख प्रत्युत्तर

महाराष्ट्रातून 2024 मध्ये ‘हे’ खासदार निवृत्त होणार (Rajya Sabha Elections)

महाराष्ट्रातील एकूण ६ खासदारांचा कार्यकाळ २ एप्रिलला संपणार आहे. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे, काँग्रेसचे खासदार कुमार केतकर, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, भाजपचे खासदार श्री. व्ही. मुरलीधरन, राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण या खासदारांचाही समावेश यामध्ये आहे. येत्या २७ मार्चला राज्यसभेसाठी निवडणूक पार पडणार आहे. तर २६ मार्चलाच निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

हेही पहा : मुनव्वर फारुकी झाला ‘बिग बॉस १७’चा विजेता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here