Football : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नगर जिल्ह्याचा फुटबॉल संघ जाहीर; २० खेळाडूंसह दाेन राखीव खेळाडूंचा समावेश

Football : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नगर जिल्ह्याचा फुटबॉल संघ जाहीर; २० खेळाडूंसह दाेन राखीव खेळाडूंचा समावेश

0
Football
Football

Football team : नगर : अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशन (Ahmednagar District Football Association) तर्फे राज्यस्तरीय खुल्या पुरुष गटातील फुटबॉल (Football) स्पर्धेसाठी जिल्ह्याचा संघ निवडला आहे. नुकतेच जिल्हा निवड चाचणी स्पर्धा (Selection Test Competition) भुईकोट किल्ला मैदान येथे पार पडली.

हे देखील वाचा: साेशल मीडियावर गप्पा ठाेकण्यापेक्षा सरकारी दरबारी हुशारी दाखवा; विरोधकांच्या टीकेवर मनोज जरांगेंचं चोख प्रत्युत्तर

निवड झालेले खेळाडू अहमदनगरचे प्रतिनिधित्व करणार (Football)

या निवड चाचणीतून खेळाडूंची जिल्ह्याच्या संघात निवड करण्यात आली आहे. नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय खुल्या पुरुष गटातील फुटबॉल स्पर्धेत निवड झालेले खेळाडू अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. जिल्ह्याच्या फुटबॉल संघाच्या २० खेळाडूंसह दोन राखीव खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यामध्ये रोनक दीपक जाधव, ओम भास्कर महांडुळे, योगेश बाळासाहेब चेमटे, रितेश मनोज रणमाळे, कुणाल कैलास नाडे, अतुल राजेंद्र नकवाल, शशांक जितेंद्र वाल्मिकी, अभय नितीन साळवे, अरमान रशिद फकिर, ओम राहुल म्हस्के, फैजान कासीफ खान, सरफराज अल्लाहबक्ष खर्चे, रिशी सुभाष कनोजिया, रितीक प्रेमचंद छजलाने, कुणाल मंगल छजलाने, हिमांशु विनोद थोरात, कृष्णा विलास चव्हाण, जोनाथन व्हिक्टर जोसेफ, सुयोग गौतम महागडे, अरमान इक्बाल शेख तर राखीव खेळाडू स्वराज राजाभाऊ वाघमारे व सार्थक राजेंद्र भोसले यांचा समावेश आहे.

नक्की वाचा: कंटेनर व दुचाकींच्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू

अनेक संघातील खेळाडूंचा सहभाग (Football)

या खेळाडूंची निवड असोसिएशनचे सहसचिव व्हिक्टर जोसेफ, सहसचिव प्रदीपकुमार जाधव, उपाध्यक्ष खालिद सय्यद व कार्यकारी सदस्य राजेंद्र पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. जिल्हा निवड चाचणी स्पर्धेमध्ये सहभागी झालेले फिरोदीया-शिवाजियन्स फुटबॉल क्लब, गुलमोहर फुटबॉल क्लब, बाटा फुटबॉल क्लब, सिटी क्लब, सुमन फुटबॉल क्लब, गुलमोहर फुटबॉल क्लब, जहारवीर फुटबॉल क्लबमधील खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष जोगासिंग मिनहास, कार्यकारी सदस्य रमेश परदेशी, कार्यकारी सदस्य व्हिक्टर जोसेफ, कार्यकारी सदस्य रणबीरसिंग परमार, कार्यकारी सदस्या पल्लवी सैंदाणे, झेव्हियर स्वामी तसेच मदतनीस राजेश ॲंथनी उपस्थित होते.


राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी जिल्ह्याच्या संघास जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, मानद सचिव रोनप ॲलेक्स फर्नांडीस व खजिनदार रिशपालसिंग परमार आदींनी शुभेच्छा दिल्या. नागपूर येथे अहमदनगर संघाचा पहिला सामना वर्धा जिल्हा संघाबरोबर खेळला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here